Jalgaon Political: डॉ. संभाजीराजे पाटील यांचा उपमुख्यमंत्री पवार, तटकरेंच्या उपस्थितीत NCPमध्ये जाहीर प्रवेश!

Political News : संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचा संविधान मेळावा संपन्न झाला
Chhatrapati Sambhajinagar- Deputy Chief Minister Ajit Pawar joining NCP Party along with Dr. Sambhaji Raje Patil, activists and dignitaries.
Chhatrapati Sambhajinagar- Deputy Chief Minister Ajit Pawar joining NCP Party along with Dr. Sambhaji Raje Patil, activists and dignitaries.esakal

पारोळा : संभाजीनगर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचा संविधान मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार अमोल मिटकरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय पवार, सामाजिक न्याय विभाग सुनील मगरे ,एरंडोल तालुका अध्यक्ष अमित पाटील, रमेश पाटील, प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Jalgaon Political Dr Sambhaji Raje Patil entry in NCP marathi news)

राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे या कार्यक्रमात उपस्थित होते. या भव्य अशा कार्यक्रमात डॉ संभाजीराजे पाटील यांच्यासह पारोळा एरंडोल भडगाव कासोदा येथील विविध क्षेत्रातील 262 सदस्यांनी यावेळी जाहीर प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगरात डॉ संभाजीराजे आलेत हा योगायोग उत्तम आहे, आता तुम्ही घोडदौड सुरू ठेवा. आम्ही आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. प्रवेश सोहळ्यास महिलांची विशेष उपस्थिती बघून रुपाली चाकणकर यांनी विशेष कौतुक केले. लवकरच या सर्व महिला कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पारोळा येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar- Deputy Chief Minister Ajit Pawar joining NCP Party along with Dr. Sambhaji Raje Patil, activists and dignitaries.
Maharashtra Politics : Mahayuti आणि MVA चं जागा वाटपाचा घोळ कायम | BJP | NCP | Shivsena

पुढील भूमिका लवकरच

"उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्यातील मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या सोबत सातत्याने भेटी झाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विकासात्मक धोरण हे मतदारसंघातील शेतकरी, उद्योग विकासासाठी आवश्यक आहेत. त्यामुळेच हा प्रवेश असून पुढील धोरण आणि निर्णय पुढील बैठकीत ठरतील. लवकरच पत्रकार परिषद देखील घेऊ.आज मोठ्या संख्येने प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांचे आभार."- डॉ. संभाजीराजे पाटील

Chhatrapati Sambhajinagar- Deputy Chief Minister Ajit Pawar joining NCP Party along with Dr. Sambhaji Raje Patil, activists and dignitaries.
Tasgaon Politics : खासदार संजय पाटील गटाला मोठा धक्‍का; कट्टर समर्थक सचिन पाटील अजित पवार गटात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com