Jalgaon Congress News : काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली! प्रदेश उपाध्यक्षांच्या सत्कारास जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना डावलले

Political News : शहर काँग्रेस कमिटीने कार्यक्रमाचे आमंत्रणच दिले नाही. त्यांचे जाहिरातीतही फोटो छापले नाहीत. यावरून जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी पडल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
congress party
congress partyesakal

Jalgaon Congress News : शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी (ता. १०) प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा, जळगाव ग्रामीण काँग्रेस, शहर काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा शिंदे यांचा सत्कार समारंभास पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष दिसले नाहीत.

त्यांना शहर काँग्रेस कमिटीने कार्यक्रमाचे आमंत्रणच दिले नाही. त्यांचे जाहिरातीतही फोटो छापले नाहीत. यावरून जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी पडल्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. दरम्यान, याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष श्‍याम तायडे यांना दोन वेळा फोन करूनही त्यांनी फोन उचलला नाही. (Jalgaon political Faction broke out in Congress)

शहर काँग्रेसतर्फे झालेल्या कार्यक्रमास कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांसह सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय, युवक जिल्हाध्यक्ष दिसले नाहीत. यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राज्यात क्रमांक एकचे यश मिळाले. त्यामुळे राज्यात कॉंग्रेस बळकट होत आहे.

जळगाव जिल्ह्यातही रविवारी (ता. ७) खिरोदा (ता. रावेर) येथील कॉंग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास प्रदेशचे नेतेही, महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसमध्ये बळकटीकरण सुरू झाल्याचे चित्र होते.

मात्र, बुधवारीच्या कार्यक्रमात जिल्हा पदाधिकाऱ्यांना डावलून कार्यक्रम झाल्याने पक्षात उघड गटबाजी असल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या गटबाजीमुळे जिल्हा कॉंग्रेससमोर नवीन आव्हान ठाकणार असल्याचे चित्र दिसत आहे. (latest marathi news)

congress party
Pune Congress : काँग्रेसचा पुण्यातील पाच मतदारसंघांवर दावा, १४ इच्छुकांचे अर्ज देखील झाले दाखल

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे वारे वाहत आहेत. सर्वच पक्षांतर्फे मतदारसंघनिहाय उमेदवारांचा शोध सुरू आहे. जिल्हा कॉंग्रेसमध्ये मात्र उघड गटबाजी असल्याचे दिसून आले. जिल्हाध्यक्षांना डावलून प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा सत्काराचा कार्यक्रम झाल्याचे बोलले जात आहे.

"कॉंग्रेस भवनात कार्यक्रमाचे आपणाला कोणी सांगितले नाही. संबंधितांनी कार्यक्रम घेत आहोत, असेही सांगितले नाही. वास्तविक जिल्हाध्यक्षांना विचारून कार्यक्रम घ्यावा लागतो, असा प्रोटोकाल आहे. त्यांनी तो पाळला नाही. कदाचित त्यांची वेगळी कॉंग्रेस असेल."

- प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी

"काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनाच शहर काँग्रेसने कार्यक्रमास बोलावले नाही. काँग्रेसचा कोणत्याही शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, गटप्रमुखांना बोलाविले नाही. यामुळे आम्हीही कार्यक्रमाला गेलो नाही."- ज्ञानेश्‍वर कोळी, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस

congress party
Vidhan Prishad Election: फडणवीसांची आकडेमोड विधानपरिषद जिंकणार ? भाजप आमदारांना दिली मतदानाची गुरुकिल्ली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com