Jalgaon Politics : आयुक्तांच्या बदलीमागे राजकीय खेळी?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : महापालिका आयुक्तपदाचा सध्या ‘खो-खो’चा खेळ सुरू आहे. आयुक्तांची बदली प्रशासकीय बाब आहे. मात्र, पडद्यामागे मोठी राजकीय खेळी सुरू असल्याची चर्चा आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी निवृत्त झाले. त्यानंतर आयुक्तपदी कोण येणार याची चर्चा सुरू होती. त्याचवेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभारी कारभार होता. मात्र, नवीन आयुक्त न आणता डॉ. गायकवाड यांनाच आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली. विशेष म्हणजे राजकीयदृष्ट्या त्याला सर्वांचीच सहमती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनीही हिरवा कंदील दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Cyber Crime : वीजबिल अपडेटच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

नियुक्तीनंतर तब्बल सात महिने डॉ. गायकवाड यांनी काम केले. त्यांच्या कामाबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. मध्यंतरी महापौर जयश्री महाजन यांच्याशी त्यांचे बिनसल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वाद संपला आणि एकमेकींच्या सहकार्याने काम करू लागल्या. महापालिकेत अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्तावाचा वाद उफाळला. त्यात शहर अभियंता, महापौर, उपमहापौर व नगरसेवक यांच्यात संघर्ष झाला. तो अद्यापही सुरूच आहे. मात्र, या वादात आयुक्त डॉ. गायकवाड अलिप्तच राहिल्या.

शहरातील रस्त्याच्या कामांच्या मुद्यांवर आमदारांशी वाद झाल्याची चर्चा आहे. आमदार सुरेश भोळे यांनी काही प्रस्ताव दिले होते, त्यांनी त्याबाबत महापालिकेत बैठकही घेतली होती. मात्र, त्यानुसार निधीतून कामे झाली नाहीत. शहरातील रस्तेही झाले नाहीत. आयुक्त श्रीमती गायकवाड यांच्यामुळेच ही कामे झाले नाहीत, असा ठपका आमदार भोळे यांनी आयुक्तांवर ठेवला. विशेष म्हणजे विधीमंडळात या विषयावर ताराकिंत प्रश्‍नही आमदार भोळे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतरही आयुक्त व आमदार भोळे यांच्यात अंतर्गत वाद सुरूच होता.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Crime News : फवारणीचे द्रावण घेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

शहरातील रस्त्यांची कामे झालेली नाहीत. नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आमदार सुरेश भोळे आयुक्तांच्या बदलीसाठी प्रयत्नशील असावेत, असे समजते. त्यांच्या बदलीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचीही सहमती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आयुक्तांची बदली करण्याबाबत सहमत नसल्याचे समजते.

अधिकाऱ्यांची बदली आणि त्या जागेवर होणारी नियुक्ती पालकमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाही, असा अलिखित नियम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाराजीत का होईना, पालकमंत्री पाटील यांनी त्याला सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे आयुक्तांच्या बदलीचे आदेश निघाले. नंतर पुढे डावपेच अधिकच सुरू झाले. बदली झालेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बदलीविरुद्ध ‘मॅट’मध्ये याचिका दाखल केली. ‘मॅट’ने त्यांना स्थगिती दिली. पदभार घेतलेले आयुक्त रजेवर गेले. दुपारी ते खासगी वाहनाने नांदेडकडे निघाले होते. सायंकाळी डॅा. गायकवाड पदभार घेणार होत्या. मात्र, त्यांनी सकाळी पदभार घेण्याचे ठरविले. त्यानंतर घड्याळाप्रमाणे राजकीय काटेही फिरल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

नांदेडकडे निघालेले आयुक्त पवार यांना अजिंठाजवळ संदेश गेला आणि आणि त्यांनी आपले वाहन पुन्हा जळगावकडे वळविल्याची माहिती आहे. जळगावातील एका नेत्याचा हा संदेश होता, असेही सांगण्यात येत आहे. सकाळी दहाला श्रीमती गायकवाड येणार, म्हणून महापालिकेतील अधिकारी सज्ज होते. त्याऐवजी श्री. पवार आले आणि त्यांनी आपले कामही सुरू केले. त्यामुळे सर्वच बुचकाळ्यात पडले. प्रशासनाचे स्थगितीचे कोणतेही आदेश नसल्यामुळे आपली एक दिवसाची रजा रद्द करून श्री. पवार यांनी पुन्हा पदभार घेतला.

श्रीमती गायकवाड प्रशासनाकडून बदली आदेशाची प्रतिक्षा करीत आहेत. या सर्व प्रक्रियेत राजकीय डावपेच असल्याशिवाय प्रशासनात हे होऊच शकत नाही, अशीही चर्चा आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : गोवर आजाराबाबत महापालिका Alert मोडवर

याबाबत आमदार भोळे यांनी सांगितले, की आयुक्तांबाबत आपली कोणतीही तक्रार नाही. कोणीही आयुक्तपदावर असले, तर त्यांनी आपले काम केले पाहिजे. कारण निधी आम्ही आणतो. त्यासाठी आम्हाला शासन दरबारी संघर्ष करावा लागतो. जनतेच्या कामांसाठीच आमचे प्रयत्न असतात.

रस्ते व इतर कामे होत नसतील, तर आम्ही आमची नाराजी व्यक्त करतो व आम्हाला वरिष्ठ स्तरावरच सांगावेच लागते. त्यामुळे आपण विधीमंडळातही प्रश्‍न उपस्थित केला होता. मात्र, आयुक्तपदावर कोणीही असले, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. जनतेची कामे करण्यास विलंब लावल्याबाबत जनतेची दिलगीरी व्यक्त करून आयुक्तांनी काम सुरू करावे. त्याला आपली कोणतीही हरकत नाही. आपण विकासासाठी निधी आणण्याचे कर्तव्य करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com