Jalgaon PM Modi Daura : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी (ता. २५) ‘लखपती दीदी’ महिला मेळाव्याला येणार आहेत. ते दीड तास मेळाव्यात मार्गदर्शन करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. (PM Modi in city for hour half on Sunday).रविवारी सकाळी ९ वाजून पाच मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून जळगावकडे येण्यास निघतील. सकाळी अकराला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर येतील. नंतर हेलिकाॅप्टरने जळगाव विमानतळाकडे येण्यास निघतील. ११ वाजून ५० मिनिटाला जळगाव विमानतळावर येतील. दुपारी बाराला प्राईम इंडस्ट्रियल पार्कवर होणाऱ्या ‘लखपती दीदी’ मेळाव्याठिकाणी पोहोचतील. दुपारी १२ ते दीड ते मेळाव्यास मार्गदर्शन करतील. दुपारी १.३५ ला मेळाव्याठिकाणावरून निघून जळगाव विमानतळावर येतील. दुपारी पावणे दोनला जळगाव विमानतळावरून छत्रपती संभाजीनगर विमानतळावर हेलिकाप्टरने जातील. तेथून ते राजस्थानला रवाना होतील. (latest marathi news).Latest News Updates : एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी .सभेठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेटपंतप्रधान मोदी जळगावला येणाऱ्या ठिकाणी मंडप उभारणीसह विविध सुविधांची निर्मिती सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. २१) दुपारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा या कार्यक्रमाचे समन्व्यक आर. एस. लोखंडे, संबंधित यंत्रणांचे नोडल अधिकारी या वेळी उपस्थित होते..Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’मुळे अनेक हातांना काम! व्यावसायिकांत समाधान; बँकेच्या नियमानुसार हजार रुपये खात्यातच.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.