Ladki Bahin Yojana : तलाठी, सेतू कार्यालयासमोर महिलांच्या रांगा! ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी

Jalgaon News : महिलांनी उत्पन्न व इतर आवश्‍यक दाखले घेऊन सोमवारी (ता. १) शहरातील तलाठी व सेतू कार्यालयात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती.
The rush to get the documents at the Pimprala Talathi office.
The rush to get the documents at the Pimprala Talathi office.esakal

जळगाव : अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आहे. या योजनेची अंमलबजावणी जुलैपासूनच होणार आहे. महिलांनी उत्पन्न व इतर आवश्‍यक दाखले घेऊन सोमवारी (ता. १) शहरातील तलाठी व सेतू कार्यालयात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी केली होती. (jalgaon Queues of women in front of Talathi Setu office Ladki Bahin scheme)

शहर तलाठी कार्यालय, पिंप्राळा, मेहरूण तलाठी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांत महिलांसह नागरिकांनी या योजनेचे अर्ज भरण्यासाठी विविध कागदपत्रे घेवून रांगा लावल्या होत्या. कागदपत्रे अपुरी असल्यास महिला घरी जाऊन किंवा कुटुंबीयांकडून कागदपत्रे मागवून घेत होत्या. सेतू सुविधा केंद्रात बोलायलाही वेळ नव्हता.

पाच हजार दाखल्याचे वितरण

शहरातील सर्व तलाठी कार्यालयातून उत्पन्नाचे सुमारे पाच हजारांवर दाखले देण्यात आले. सकाळपासून पिंप्राळ्याचे तलाठी संदीप ढोबाळ, शहर तलाठी राहुल सोनवणे कार्यालयातच बसून होते.

१५०० रुपये मिळणार

या योजनेनुसार महिलांना महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत. त्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरू शकतील यासंदर्भातील माहितीचा अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. (latest marathi news)

The rush to get the documents at the Pimprala Talathi office.
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’साठी कोण असेल पात्र?

योजनेच्या अशा आहेत अटी.

*लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

*लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे

*विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला

*योजनेचा लाभ २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष होईपर्यंत मिळेल

*योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते आवश्यक

*ज्याच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत असेल, तर त्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ नाही

*ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा निवृत्तिवेतन घेत आहेत, अशा कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही

*शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे १५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही

*ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत

*ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) आहेत, असा कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही

The rush to get the documents at the Pimprala Talathi office.
Ladki Bahin Yojana : अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक भरणार महिलांचे अर्ज!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com