जळगाव : 'विनातिकीट' प्रवास करणे पडणार महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon railway Special ticket inspection campaign fine without ticket travel

जळगाव : 'विनातिकीट' प्रवास करणे पडणार महागात

भुसावळ : वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अनेक फुकटे प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. या फुकट्यांना पायबंद घालण्यासाठी भुसावळ विभागात तिकीट तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी ७५ तिकीट तपासनिसांचे पथक तयार केले आहे. त्यांना दररोज एकूण ३० लाख रुपये दंड वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. तर वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनीही स्वत: महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये अचानक तिकीट तपासणी केली.

लग्नसराई, उन्हाळी सुटीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात अनेक जण विनातिकीट, आरक्षण नसताना आरक्षित डब्यातून प्रवास, स्लीपर कोचचे आरक्षण असताना एसी डब्यातून प्रवास करतात. काही प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त लगेज सोबत बाळगतात. यामुळे रेल्वेचे नुकसान होते. शिवाय नियमानुसार तिकीट काढून, आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांना त्रास होतो.

याबाबत ओरड वाढल्याने डीआरएम एस. एस. केडिया, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांनी भुसावळ विभागात १ मेपासून कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी तिकीट तपासणीसाठी एक स्वतंत्र पथक नेमले. भुसावळातून खंडवा, बडनेरा, मनमाड मार्गावर हे पथक विविध स्थानके, धावत्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अचानक तिकीट तपासणी करते. त्यात नियमबाह्य प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो.

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये तपासणी

सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये भुसावळ ते बडनेरादरम्यान स्वत: प्रवाशांकडील तिकिट तपासणी केली. सहा तिकीट तपासणीस मदतीला होते. विनातिकीट व नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचे आदेश सिनियर डीसीएम शिवराज मानसपुरे यांनी पथकाला दिले.

Web Title: Jalgaon Railway Special Ticket Inspection Campaign Fine Without Ticket Travel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top