Ramdev Wadi Accident Case: आणखी एक बिल्डरपुत्र; शासकीय कंत्रांटदाराचा मुलगा अन मैत्रिणीचाही सहभाग

Jalgaon Accident News : या प्रकरणाला तपासाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिला नसल्याने त्यांची नावे समोर येऊ शकली नाहीत.
Accident
Accidentesakal
Updated on

जळगाव : रामदेववाडी अपघात प्रकरणात मुंबईतून ताब्यात घेतलेल्या दोघांसह जळगावच्या गायत्रीनगरातून एकाला शनिवारी (ता. २५) ताब्यात घेण्यात आले. तिघांच्या अटकेनंतर आता या प्रकणात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता असून, अपघातस्‍थळावर दिसलेली दुसऱ्या कारसह आणखी एक बिल्डरपुत्र, शासकीय कंत्रांटदार कुटुंबातील मुलगा अन्‌ त्यांच्यासोबत एक मैत्रीण, अशा तीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाला तपासाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिला नसल्याने त्यांची नावे समोर येऊ शकली नाहीत. (jalgaon Ramdev Wadi Accident Case news)

जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडीजवळ मेस सुसाट कारने दुचाकीला धडक दिल्याने आईसह दोन मुले व भाचा. असा चौघांचा मृत्यू झाला होता. दाखल गुन्ह्यात पोलिसांनी १७ दिवसांनंतर अखिलेश संजय पवार व अर्णव अभिषेक कौल यांना २३ मेस मुंबईतून ताब्यात घेऊन जळगावात आणले. त्यांना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या दोघांसोबत त्याच कारमध्ये असलेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव घटना घडल्यापासून चर्चेत आले होते.

मात्र, अटकेतील संशयितांच्या जबाबात त्याचे पुन्हा नाव आल्यानंतर पोलिसांनी ध्रुव नीलेश सोनवणे (रा. गायत्रीनगर) याला शनिवारी अटक केली. या तिघा संशयितांची पोलिस कोठडीत चौकशी सुरू असून, सोमवारी (ता. २७) पोलिस कोठडीची मुदत संपणार असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वीच या प्रकरणात नव्या चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, रामदेववाडी अपघात हिट ॲन्ड रनचा प्रकार मुळीच नाही. कारण अपघातानंतर गाडीतील तरुण पळाले नाहीत. सरळ सरळ अपघात आहे. रेसिंगचा प्रकार मुळीच नाही, असा बचाव काही राजकीय ‘झेलकरी’ पहिल्या दिवसांपासून करीत आहेत. हिट ॲण्ड रन नाही, कुणी घटनास्थळावरून पळून गेलेले नाही.

मग पळून गेलेला तिसरा संशयित आला कुठून. आता या प्रकरणात घटनास्थळावर ग्रामस्थांनी पाहिलेल्या दुसऱ्या कारची चर्चा सुरू झाली आहे. ती कार ग्रामस्थांनी फोडल्याचेही सांगण्यात येत आहे. तपासात हिट ॲन्ड रनसहित रेसिंग कारचाही थरार उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (latest marathi news)

Accident
Pune Porsche Accident: 3 लाख रुपये घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकले; अमितेश कुमारांचा धक्कादायक खुलासा

पार्टीनंतर रेसिंगचा थ्रील

प्राप्त माहितीनुसार, शिरसोली रोडवरील एका शैक्षणिक कॅम्पसमध्ये घटनेच्या अगोदर जंगी पार्टी झाली. पार्टीत सहभागी बिगडे नवाबांना रेसिंगचा थ्रिल अनुभवायचा असल्याने त्यांनी गाड्या काढून सुसाट सुटले. अपघातग्रस्त गाडीत मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे निकटवर्तीय अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव, अजित पवार गटाचे संजय पवार यांचा मुलगा अखिलेश, ध्रुव नीलेश सोनवणे या तिघांचा समावेश होता.

तर याच गाडीच्या मागे-पुढे सुसाट धावणारी आणखी एक कार होती. त्या कारमध्ये एक बिल्डरपुत्र, एका शासकीय कंत्राटदार कुटुंबातील मुलगा आणि या दोघांची मैत्रीण असे तिघे होते, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत तपासाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, तसला काही प्रकार अद्याप तपासात आढळला नसून, प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पुरावे समोर आल्यावर नेमके काही सांगता येईल, असे म्हणत या माहितीला दुजोर मिळू शकलेला नाही.

Accident
Pune Porsche Accident : पब-बारचालकांवर अंकुश ठेवण्याची गरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com