Jalgaon News : ज्वारी खरेदीसाठी 450 शेतकऱ्यांची नोंदणी! गोदाम उपलब्ध नसल्याचा तहसीलदारांकडून खुलासा

Jalgaon News : मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामाच्या ज्वारीला ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन केले होते
jowar
jowaresakal

अमळनेर : शासनाने ज्वारीला बाजारभावापेक्षा अधिक हमीभाव देऊन खरेदीला मंजुरी दिली असून, ३० जूनपर्यंत शेतकी संघाला ज्वारी खरेदी करता येणार आहे. मात्र शासकीय गोदाम मिळण्याबाबत असमर्थता असल्याने ज्वारी खरेदीस विलंब होणार आहे. (Jalgaon Registration of 450 farmers for purchase of jowar)

मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामाच्या ज्वारीला ३ हजार १८० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करून शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन केले होते. ४५० शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केलेली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी. एन. मगरे यांनी २७ मेस जिल्ह्यातील सर्व केंद्रांना खरेदीचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या गोदामात खरेदी केलेला माल साठविण्याच्या अटीवर खरेदी करण्यात येणार आहे. अमळनेर तालुका शेतकी संघाकडे स्वतःचे गोदाम उपलब्ध नाही. नित्यनियमाप्रमाणे दरवर्षी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार गोदाम उपलब्ध करून देत असतात. मात्र यावर्षी तहसीलदारांनी गोदाम उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ज्वारी खरेदी शुभारंभ लांबणार आहे.

पावसाळा सुरू झाल्यास शेतकऱ्यांना घरून माल आणणे अवघड होईल. तसेच वातावरणातील ओलावा किंवा पावसाने माल ओला झाल्यास ज्वारीला एफएक्यू दर्जा मिळणार नाही. परिणामी शेतकऱ्यांचा चांगला माल देखील नाकारला जाण्याची शक्यता असल्याने तातडीने गोदाम उपलब्ध करून खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे. (latest marathi news)

jowar
Eknath Shinde: शहाजी बापू पाटील ब्रिच कॅण्डी रुग्णालयात, CM एकनाथ शिंदेंनी घेतली भेट

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीच्या आवारात उपलब्ध असून ते रिकामे आहेत. दरवर्षी त्याचठिकाणी धान्य खरेदी केली जाते. शिक्षक आमदारांची निवडणूक लागल्याने आचारसंहिता महिनाभर वाढली आहे. त्यामुळे मंत्री, आमदार यांना यात हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे देखील विलंब होण्याची शक्यता आहे.

"‘महसूल’कडे रेशन माल ठेवतो तेच गोदाम उपलब्ध आहे. गोदाम कुठे मिळेल ते शोधणे सुरू आहे. शेतकी संघाने परस्पर एफसीआयकडे गोदामाची मागणी करावी."

- रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार, अमळनेर

"सालाबादाप्रमाणे तहसीलदारांना गोदाम उपलब्ध करण्याचे पत्र दिले आहे. गोदाम उपलब्ध झाल्यास लागलीच ज्वारी खरेदी सुरू होईल."

- संजय पाटील, व्यवस्थापक शेतकी संघ, अमळनेर

jowar
SAKAL Impact: महामार्गावरील जीवघेणा खड्ड्याची डागडुजी! पारोळा येथील खड्डा बुजविल्याने वाहनधारकांसह प्रवाशी नागरिकांमधून समाधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com