Jalgaon News : भुसावळ रेल्वेला 137 कोटींचा महसूल; एप्रिलची कमाई

Jalgaon : भुसावळ वाणिज्य विभागाने एप्रिल महिन्यात १३७ कोटीचा महसूल मिळवला आहे.
Railway
RailwaySakal

Jalgaon News : भुसावळ वाणिज्य विभागाने एप्रिल महिन्यात १३७ कोटीचा महसूल मिळवला आहे. विशेष म्हणजे सात महिन्यानंतर रावेर येथून केळीचा लोड भरून रवाना करण्यात आला. भुसावळ विभागाच्या एप्रिलच्या महसूलात लक्षणीय वाढ साधून दमदार कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, विभागाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. ( Revenue of 137 crore to Bhusawal Railway )

प्रवासी महसुलाच्या बाबतीत, भुसावळ वाणिज्य विभागाला एप्रिल मध्ये ७१ कोटी ९५ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. या यशात तिकीट तपासनीसांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून ९ कोटी २५ लाखांचा महसुल आहे. मासिक उद्दिष्ट १८.१४ टक्के ने ओलांडले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ टक्के पेक्षा जास्त आहे.

विविध कोचिंग मधून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून, ती ५ कोटी ९९ लाखांवर पोहोचली आहे. माल वाहतुकीद्वारे ५४ कोटी ६० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालगाड्यांनी मोटारगाड्या, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य, सिमेंट वॅगनसह विविध प्रकारच्या मालाची कुशलतेने वाहतूक केली आहे. पार्सल सेवेने एकूण २ कोटी ६९ लाखांचा महसूल मिळाला. इतर विविध व्यावसायिक प्रयत्नातून १ कोटी ७८ लाखांचा महसूल मिळाला आहे. (latest marathi news)

Railway
Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

रावेरमधून केळी लोडींग

रावेर स्टेशन येथून आदर्श नगर दिल्ली येथे केळी पार्सल गाडी द्वारे लोड करण्यात आली. सुमारे ७ महिन्यानंतर रावेर येथून केळीची लोडींग सुरु करण्यात आली. नाशिक रोड स्थानकावर येथे लिफ्ट आणि एस्केलेटरच्या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले, महिला, आजारी व्यक्तींसाठी खूप मदत होईल.

''ही कामगिरी संपूर्ण टीमचे समर्पण आणि परिश्रम दर्शवते. केळी उत्पादकांच्या मागणीप्रमाणे रावेर येथून केळीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटरचा दिव्यांग, ज्येष्ठांना लाभ होत आहे.''- इति पांडे (विभागीय व्यवस्थापक भुसावळ)

Railway
Jalgaon News : वाड्यापाड्यांवरील असंख्ये कुटुंबीये उघड्यावरच; ‘अच्छे दिन’पासून अजूनही दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com