Latest Marathi News | पंचनाम्यात रेशन तांदळाच्या शासकीय गोण्या निष्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhusawal: Sacks of government ration rice found in a godown in Bharatnagar in the city

Jalgaon Rice Stock Case: पंचनाम्यात रेशन तांदळाच्या शासकीय गोण्या निष्पन्न

भुसावळ : शहरातील लिंबू मार्केट, आठवडे बाजार येथे एका ट्रकमध्ये रविवारी (ता. १३) रेशन तांदळाचा साठा आढळून आला होता. यात पथकाने दोन गुदामे ‘सील’ केली असून, एकूण नऊ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सोमवारी (ता. १४) संशयित ट्रकचालकासह अॅपेरिक्षा चालकाला अटक करण्यात आली होती.

दोघा संशयितांचा जामीन मंजूर झाल्याची माहिती तपास अधिकारी मंगेश गोंटला यांनी दिली. दरम्यान, महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांनी दिलेल्या पंचनाम्याच्या अहवालात रेशनिंग तांदळाच्या शासकीय पाच गोण्या आढळून आल्या आहेत.

शहरातील लिंबू मार्केट, आठवडे बाजार तसेच भारतनगर या ठिकाणी रेशनचा तांदळ साठा गेल्या रविवारी (ता. १३) आढळून आला होता. याप्रकरणी सोमवारी (ता. १४) महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक नागरगोजे व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक सुभाष साबळे व पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत सील केलेले दोघे गोदाम उघडून पंचनामा करण्यात आला होता.(Jalgaon Rice Stock Case Government sacks of ration rice revealed in Panchnama number of suspects is likely to increase Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; Posco कायद्यानुसार गुन्हा दाखल

उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्याकडून पंचनामा अहवाल महसूल विभागाला प्राप्त न झाल्याने विलंब झाला. दरम्यान, महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांना शुक्रवारी (ता. १८) प्राप्त झाला. यामध्ये रेशन तांदळाच्या शासकीय पाच गोण्या आढळून आल्या आहेत.

पुरवठा निरीक्षक यांनी बाजारपेठ ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला यांच्याकडे पंचनाम्याचा अहवाल सुपूर्त केला असून, यात अवैध तांदूळ साठ्याच्या शासकीय पाच गोण्या मिळून आल्या आहेत. यामुळे तपासाला वेगळी दिशा मिळाल्याने या प्रकरणात संशयित आरोपींची संख्या वाढणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा: Jalgaon News : अतिक्रमणमध्ये घर जाणार या धसक्याने महिलेचा मृत्यू