जळगाव : शाळा सुरू, पण काही ठिकाणी वर्ग रिकामेच!

विद्यार्थी आलेच नाही; उशिराच्या आदेशाने संभ्रम, कोरोना नियमावलींची पालन
Jalgaon School started but classrooms are empty in some places
Jalgaon School started but classrooms are empty in some placessakal
Updated on

जळगाव : कोरोनाची तिसरी लाट आल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून शहरी भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असून शहरातील शाळा सुरू मात्र वर्ग रिकामे असल्याचे चित्र आहे. मुळात शाळा सुरू करण्याबाबत उशीराने आदेश आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. (Jalgaon School News)

Jalgaon School started but classrooms are empty in some places
आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

राज्य सरकारच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यात शहरी भागात आज (ता. २)पासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मान्यता दिली आहे. तशा सूचना सर्व गट शिक्षणाधिकारी, जळगाव महापालिकेचा शिक्षण विभाग, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बुधवारी शहरी भागातील शाळा सुरु झाल्या.

विद्यार्थीच आलेच नाही

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सुरुवातीला ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या. यानंतर आजपासून शहरी भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु आज जळगाव शहरातील कोणत्याही शाळेत विद्यार्थी दिसून आले नाहीत. जळगावातील एक- दोन शाळेत बोटावर मोजण्याइतकेच विद्यार्थी पाहण्यास मिळाले.

Jalgaon School started but classrooms are empty in some places
अकाेला : कर भरणार नाही; रस्ता आम्हीच दुरुस्त करतो!

आदेश आले उशिराने

कोरोना बाधितांची संख्‍या जेथे कमी असेल तेथील शाळा स्‍थानिक प्रशासनाच्‍या निर्णयानुसार सुरू करण्याचे आदेश होते. त्‍यानुसार जळगाव शहरातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय झाला खरा परंतु, त्‍याबाबतचे आदेश उशिराने आले. शिवाय, शाळा संस्‍थांकडून शाळा सुरू होण्याबाबतचे संदेश रात्री दहा– साडेदहाच्‍या सुमारास पडले. यामुळे पालक व विद्यार्थींमध्‍ये संभ्रम होता. तसेच शाळांमध्‍ये मुलांना सोडण्यासाठी लावलेल्‍या रिक्षाचालकांना देखील याची माहिती नव्‍हती. याचा परिणाम म्‍हणजे सकाळी शाळा सुरू झाल्‍यानंतर देखील विद्यार्थी येऊ शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com