Sharad Pawar : पंतप्रधान मोदींकडून सत्तेचा गैरवापर; शरद पवार यांची टीका

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता ही आपल्या विरोधकांचा सूड घेण्यासाठी वापरली असून, तिचा गैरवापर केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal

Jalgaon News : सत्ता ही जनतेच्या भल्यासाठी वापरावी लागते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता ही आपल्या विरोधकांचा सूड घेण्यासाठी वापरली असून, तिचा गैरवापर केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी केली. टीका समजून घेत ते प्रश्न सोडविण्याऐवजी टीका करणाऱ्याला तुरुंगात टाकले जात आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले. (Sharad Pawar statement Abuse of power by PM Modi)

चोपडा-मुक्ताईनगर येथे शुक्रवारी (ता. ३) झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथील विश्‍वनाथ जिनिंग प्रेसमध्ये जाहीर सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, आमदार शिरीष चौधरी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, की निवडणुका येतात आणि जातात, लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. दहा वर्षांपासून देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ मध्ये मोदी यांनी महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. आज तीन हजार ६५० दिवस पूर्ण झाले. मात्र महागाई कमी न होता अनेक वस्तूंचे दर वाढले. गॅस सिलिंडरचे दर २०१४ मध्ये ४१०, तर आज एक हजार १६६ रुपये झाले आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

टीका समजून घेत प्रश्न सोडवा

सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरावी लागते, असे सांगत श्री. पवार म्हणाले, की नरेंद्र मोदी सत्तेचा गैरवापर करीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम अतिशय चांगले आहे, त्यांनी एक दिवस पंतप्रधानांवर टीका केली, त्याचे परिणाम काय झाले, तर त्यांना तुरुंगात जावे लागले. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे कारागृहात जावे लागले. त्यांनी टीका का केली, हे समजावून घेऊन प्रश्‍न सोडवायला पाहिजे होते.

पदाची गरिमा घालवताहेत...

पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेसाठी काम न करता विरोधकांवर टीका करण्यातच अधिक वेळ घालवत आहेत, असा आरोप करून पवार म्हणाले, की संसदेने लोकशाही स्वीकारली. डॉ. मनमोहन सिंग, इंदिरा गांधी यांचे काम चांगले असूनही पंतप्रधान त्यांच्यावर टीका करतात हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही. मोदी फक्त टीका करीत आहेत, पदाची गरिमा घालवत आहेत. माझ्यावर व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही.

Sharad Pawar
Satara Loksaha Election : नरेंद्र पाटलांनी वाढवला साताऱ्यात महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com