Latest Marathi News | जळगाव : जावयाने टाकला सासऱ्याच्या डोक्यात दगड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beating.

जळगाव : जावयाने टाकला सासऱ्याच्या डोक्यात दगड

जळगाव : गावातच राहणाऱ्या जावयाने सासऱ्याच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. एमआयडीसी पोलिसात जावायाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथील बाळू आत्माराम पाटील शेतकरी आहे. त्यांच्या मुलीचा विवाह दीपक एकनाथ पाटील यांच्यासोबत सहा वर्षांपूर्वी झाला असून ते गावातच राहतात. जावई दीपक पाटील यास दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत तो पत्नीसह सासूला दररोज शिवीगाळ करीत असतो. रक्षाबंधनाच्या सणाला त्याची पत्नी माहेरी आली असल्याने त्याने थेट तेथेच धडक दिली.

हेही वाचा: प्रेयसीचा पाहुणचार सल्ल्याला पडला महागात; LCBने ठोकल्या बेड्या

पोटात दारु अन्‌ हातात चाकू

यथेच्छ दारु पिल्यानंतर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दीपक पाटील हातात चाकू घेत सासरी धडकला. दार उघडत नाही म्हणून दारावर दगडं मारुन त्याने गोंधळ घातला. घरात शिरण्यापूर्वी सासरे बाळू पाटील यांनी घराबाहेर येत त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने सासऱ्यालाही मारहाण सुरु केली. सोडवणूक करायला आलेल्या सासू अंजनाबाई त्यांनाही मारहाण झाली. जखमींच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: कोल्हापूरातील गव्हर्नर विल्सनच्या पुतळा फोडणारा एक क्रांतिकारक अजूनही हयात

Web Title: Jalgaon Son In Law Try To Kill His Father In Law By Threw Stones On Head

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News