Jalgaon News : सोनगीरच्या भांडी व्यवसायात ऐन लग्नसराईत ‘शीत लहर’; तांब्याच्या दरात वाढीचा फटका

Jalgaon : तांबे व पितळेच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाल्याने येथील कारागिरांनी तयार केलेल्या भांड्यांच्या मागणीत कमालीची घट झाली असून, तांबे-पितळेचा कच्चा माल येणे बंद झाले आहे.
Artisan making pottery.
Artisan making pottery.esakal

Jalgaon News : तांबे व पितळेच्या दरात दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाल्याने येथील कारागिरांनी तयार केलेल्या भांड्यांच्या मागणीत कमालीची घट झाली असून, तांबे-पितळेचा कच्चा माल येणे बंद झाले आहे. कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनी नवीन भांडी तयार करवून घेणेही थांबविले आहे. त्यामुळे येथील कारागिरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. येथील तांबे-पितळेच्या भांड्यांना राज्यभरच नव्हे तर परराज्यातही मागणी आहे. ()

भांडी तयार करून विक्री करणे हा येथील तांबट, बांगडी व गुजराथी कासार समाजाचा पिढ्यान् पिढ्या चालत आलेला व्यवसाय असून, इतर समाजानेदेखील या व्यवसायात उडी घेतली आहे. सुमारे दोनशे कुटुंबे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या व्यवसायात असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र स्टीलचे आक्रमण, भांडी तयार करताना यंत्रांचे झालेले आगमन आदींमुळे व्यवसायाला उतरती कळा लागली आहे

व्यवसायाचे स्वरूप

राज्यातील व परराज्यातील व्यापारी येथे येतात व कारागिरांकडून हवी ती भांडी तयार करून देशभर विक्री करतात. पूर्वी येथे फक्त कारागीर होते. मात्र आता अनेक कारागीर व्यापारी झाले आहेत. भांड्यांसाठी लागणारा कच्चा माल व पत्र्याची चकती पुणे, भंडारा, इंदूर, उज्जैन येथून मागविली जाते. चकतीला हातोड्याने ठोकून योग्य आकार दिला जातो. भट्टीवर तापवून सुबकता आणली जाते. तयार झालेली भांडी टिकाऊ, मजबूत व आकर्षक असतात.

मोठी दरवाढ

सध्या तांब्याच्या कच्च्या मालाचा दर ७५०-८०० रुपये किलो आहे. मजुरीचा खर्चानुसार तयार वस्तू १००० ते ११०० रुपये किलो विक्री होत आहे. दोन महिन्यांपूर्वी तयार मालाला ८५० ते ९०० रुपये किलो दर होता. पितळेच्या कच्च्या मालाची किंमत ६०० ते ७०० रुपये किलो असून, तयार वस्तू ८०० रुपये किलोने विक्री होत आहे. तयार घंघाळ हजार रुपये, हंडा एक हजार ५० व कळशी एक हजार १०० रुपये किलोने मिळत आहे. मोठी दरवाढ झाल्याने मागणीत घट झाली आहे. (latest marathi news)

Artisan making pottery.
Jalgaon News : भुसावळला नालेसफाईअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात; नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छतेकडे दुर्लक्षच

भांडी तयार करण्यासाठी विविध हातोडे, लाकडी मोगरी, विविध पकडी, चिमटे, कात्री, दगडी कोळसा, कोक (चुरीचा कोळसा), सल्फ्युरिक आम्ल आदी अनेक वस्तूंची गरज असते. यांपैकी प्रत्येक वस्तू महागडी असून, कोळशाच्या दरात चढ-उतार होत असल्याने भांडीच्या भावात बदल होतो.

भांड्यांना मागणी

तयार भांड्यांना लग्नसराईत सर्वाधिक मागणी असते. याशिवाय दिवाळी, दसराला बऱ्यापैकी मागणी असते. खानदेशात केवळ सोनगीरला कारागीर आहेत. त्यामुळे सर्वाधिक व्यापारी येथे येतात. येथे प्रामुख्याने पातेले, परात, घंगाळ, घागर, गुंडा, कळशी, तपेली, बादली व मागणीप्रमाणे लहान-मोठी भांडी तयार करून दिली जातात. भांडी विक्री वर्षभर सुरू असते, मात्र पावसाळ्याचे चार महिने भांडी तयार करणे बंद असते.

व्यवसायातील अडचणी

स्टील व ॲल्युमिनिअमचे आक्रमण, भांडी तयार करण्याचे कारखाने सुरू झाल्याने त्याचाही परिणाम झाला आहे. सध्या कच्च्या मालात व मजुरीत भाववाढ झाल्याने भांडी विक्रीत मंदी असून, कारागिरांना कामे नाहीत अशी स्थिती आहे.

Artisan making pottery.
Jalgaon News : विवाहात अवांतर खर्चाला फाटा देवून समाजभवनास मदत; पाचोरा येथे गुर्जर परिवाराचा आदर्श

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com