Jalgaon News : अखेर नशिराबाद उड्डाणपुलाचे रखडलेले काम सुरू

Jalgaon News : तरसोद ते चिखली महामार्गाच्या चौपदरीकरणात नशिराबादजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम (भुसावळ ते जळगाव) २०२२ पासून रखडले होते.
Ongoing work on flyover near Nashirabad.
Ongoing work on flyover near Nashirabad.esakal
Updated on: 

Jalgaon News : तरसोद ते चिखली महामार्गाच्या चौपदरीकरणात नशिराबादजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम (भुसावळ ते जळगाव) २०२२ पासून रखडले होते. त्या कामास आता सुरवात झाली असून, येत्या सहा महिन्यांत काम पूर्ण होईल, अशी माहिती महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली. तरसोद ते चिखलीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला कोरोनाच्या अनलॉकनंतर ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. (Jalgaon Stalled work of Nashirabad flyover finally started)

७० ते ८० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर नशिराबाद टोल नाक्यावर टोल वसुली सुरू झाली. मात्र, या मार्गावरील एका भागाचे उड्डाणपुलाचे काम बाकी होते. सध्या रेल्वे उड्डाणपुलावर एकेरी मार्गाने वाहतूक सुरू आहे. चिखली (ता. मुक्ताईनगर) ते तरसोददरम्यान ८८.७ किलोमीटर लांब अंतराच्या महामागाचे चौपदरीकरणाचे काम आहे.

तरसोद फाट्यापासून मुक्ताईनगर तालुक्यातील चिखलीपर्यंत, म्हणजे विदर्भातील मलकापूरच्या सीमेपर्यंतच्या टप्प्यातील ६३ किलोमीटर लांबीचे काम वेल्स्पन इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले. या एजन्सीने युद्धपातळीवर काम करत ते पूर्णत्वाकडे नेले आहे. अगदी लॉकडाउनच्या काळातही या कामाची गती वाढवून ते मुदतीत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले. कामाची मुदत ऑक्टोबर २०२१ पर्यंत होती, तरी नशिराबाद टोल नाक्याजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे काम बाकी आहे. (latest marathi news)

Ongoing work on flyover near Nashirabad.
Jalgaon Lok Sabha Election News : महाविकास आघाडीसमोर पारोळ्यातून आव्हान देण्यासाठी भाजपकडून चाचपणी

दृष्टिक्षेपात काम

टप्पा : तरसोद ते चिखली

अंतर : ६२.७ किलोमीटर

खर्च : सुमारे ९४८ कोटी

कामाची मुदत : ऑक्टोबर २०२१ पर्यंत

मक्तेदार : वेल्स्पन इन्फ्रा.

"तरसोद ते चिखलीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणातील नशिराबाद टोल नाक्याजवळील एकेरी बाजूचे रेल्वे मार्गावरील शिल्लक उड्डाणपुलाचे काम महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू केले आहे. आगामी सहा महिन्यांत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे." -रुपेश गायकवाड, प्रोजेक्ट मनेजर, महामार्ग प्राधिकरण

Ongoing work on flyover near Nashirabad.
Jalgaon Airport : जळगावातून विमान उड्डाणासाठी 18 एप्रिलचा मुहूर्त; गोवा, हैद्राबादसाठी ‘टेक ऑफ’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karad flyover Pune Bengaluru highway
Chiplun flyover latest update
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Pune Bengaluru Highway Expansion Under Scrutiny as Subcontractor Cuts Flyover Reinforcement Steel Over Pending Payments
Marathi News Esakal
www.esakal.com