जळगाव : महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgoan stray dogs

जळगाव : महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये एप्रिलमध्ये एकूण ४४९ व्यक्तींनी पाळीवसह भटक्या प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व उपचार घेतले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी काळात सकाळी इंजेक्शन विभाग येथे विविध प्राण्याच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येतात.

जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. या विभागामध्ये एप्रिल महिन्यात एकूण ४४१ व्यक्ती कुत्रा चावल्यामुळे उपचार घेण्यात आले होते. यात २४५ पुरुष, ९७ महिला तर ९९ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. महिन्याभरात ५ रुग्णांना मांजर, १ जणांना डुकर तर २ जणांना माणसाने चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

अशी घ्या काळजी

नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ पाण्याखाली जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. सकाळी ओपीडी विभागात (क्रमांक १०५) तर दुपारी आपत्कालीन विभागाला कक्ष क्रमांक एकमध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Jalgaon Stray Dogs Bitten 441 People 449 Injection In Month

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top