Latest Marathi News | जळगाव : सागवान लाकडासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; तस्करांचा शोध सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Forest Department

जळगाव : सागवान लाकडासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; तस्करांचा शोध सुरू

यावल (जि. जळगाव) : तालुक्यातील मोहराळा येथे वन विभागाच्या पूर्व, पश्चिम क्षेत्र आणि गस्ती पथकाच्या संयुक्त कारवाईत सुमारे तीन लाख रुपयांचे बेकायदेशीर सागवान जातीचे कटिंग केलेले लाकूड व कटाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वन विभागाच्या या कारवाईमुळे सातपुडा जंगलातील मौल्यवान वृक्षातोड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मोहराळे गावात गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर वन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या वेळी संशयित अय्यूब हसन तडवी याच्या घरात कुठलीही परवानगी नसताना बेकायदेशी सुमारे दोन घनमीटर सागवानचे कटसाईज केलेले ५६ नग लाकडाच्या पाट्या, सुमारे ४० हजार रुपये किमतीची कटाई मशीन व २० हजार रूपये किमतीची मोटर यंत्रणा असे एकूण तीन लाख रूपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: Congress : गाडीत सापडलं पैशांचं घबाड; काँग्रेसच्या तीन आमदारांवर मोठी कारवाई

वन विभागाचे धुळे विभागाचे वनसंरक्षक डी. डब्ल्यू. पगार, जळगाव विभागाचे डीएफओ एच. एस. पद्मनाभम, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पूर्व आणि पाश्चिम तसेच गस्ती पथकाच्या कारवाईत पूर्व विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, पश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. टी. भिलावे, गस्ती पथकाचे वन परीक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील, बी. वाय. नलावडे, वनसंरक्षक प्रमिला मराठे, सरला भोंगरे, हरिपुरा क्षेत्राचे वनपाल आर. बी. पाटील , आर. पी. तायडे, वाय. डी. तेली, पोलिस कर्मचारी सचिन तडवी, वनपाल विलास पाटील, योगेश सोनवणे, ए. एम. तडवी, वाहनचालक इमाम तडवी यांच्यासह वन विभागाच्या कर्मचारी या संयुक्त कारवाई सहभागी झाले होते.

हेही वाचा: सर्वात मोठा तस्कर NCB च्या गळाला, सोबत सापडलं ड्रग्सचं घबाड; लोखंडवाला, वर्सोवामध्ये धडक कारवाई

Web Title: Jalgaon Teak Wood Worth 3 Lakh Seized By Forest Department Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top