जळगाव : पीडिताने वाचला अत्याचाराचा पाढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape

जळगाव : पीडिताने वाचला अत्याचाराचा पाढा

जळगाव : मोबाईलवर गेम खेळण्यास देतो असे सांगत सातवर्षीय पीडितावर २२ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना पाचोरा तालुक्यात सिंधी कॉलनी येथे घडली होती. पीडिताच्या कुटुंबीयांनी संयमाने या प्रसंगाला तोंड देत पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्यात संशयित भैय्या भरत गायकवाड (वय २२, रा. श्रीरामनगर) यावर दोषारोप सिद्ध होऊन जिल्‍हा न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

पाचोरा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीप्रमाणे, ७ मार्च २०१८ रोजी सातवर्षीय पीडिता गल्लीत खेळत होती. श्रीरामनगर सिंधी कॉलनीतील भैय्या भरत गायकवाड याची तिच्यावर नजर पडली. तुला मोबाईलमध्ये गेम खेळायचा आहे काय, असे सांगत तो पीडिताला सोबत घेऊन गेला. पीडिताला घरात घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्यात आला. घडल्या प्रकरणात पीडिताच्या आईस कुटुंबीयांवर तक्रार देऊ नये यासाठी प्रचंड दबाव आला असताना त्यांनी पाचोरा पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिल्यावरून बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम- २०१२ च्या कलम- ७, ८ सह इतर कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपासाधिकारी दत्तात्रय नलावडे यांनी तपास पूर्ण करून वेळेत खटला जिल्‍हा न्यायालयात दाखल केला. न्या. एस. एन. माने (गाडेकर) यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू होते. जिल्‍हा सरकारी अभियोक्ता ॲड. केतन ढाके यांनी खटल्यात १० महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या. त्यात पीडिता, फिर्यादी, तपासाधिकारी, अत्याचारित पीडितावर उपचार करणारे डॉक्टर अशांच्या साक्ष प्रभावी आणि अचूक ठरल्या.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

पीडिताने वाचला अत्याचाराचा पाढा

अवघ्या सातवर्षे वयाच्या पीडिताची साक्ष भरल्या न्यायालयात नोंदवण्यासाठी सरकारी पक्षाचे कसब पणाला लागले होते. तिने तिच्याच भाषेत त्या दिवसाचा घटनाक्रम मांडला. ते ऐकून सर्व स्तब्ध झाले. लहान मुलांसाठी घराबाहेर गल्लीत खेळणेही सुरक्षित नाही का? तसेच, कुणावरही अंधविश्वास घातकीच ठरतो हे देखील अधोरेखित झाले.

अशी कलमे, अशी शिक्षा

बलात्कार : कलम- ३७६ (२) (एफ) (आय).

बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम- २०१२ चे कलम- ३ व ४ : १० वर्षे सक्त मजुरी २५ हजार दंड.

कलम- ३५४ (अ)- २ वर्षे सक्त मजुरी ५०० रुपये दंड.

कलम- ३५४ (ब)- ३ वर्षे सक्तमजुरी ५०० रुपये दंड.

एकत्रित भोगायची शिक्षा- १० वर्षे सक्तमजुरी ३५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वर्षे सहा महिने साधी कैद.

loading image
go to top