
Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ
मुंबई : राज्यात कोविड रुग्णसंख्या काहीशी वाढली असून आज 886 नवे रुग्ण सापडले. मृतांची संख्या ही वाढली असुन आज 34 रुग्ण दगावले. सोमवारी 19 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली होती. आज 948 बाधित रुग्ण बरे झाले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,69,739 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.64 % एवढे झाले आहे.
हेही वाचा: २६ नव्हे तर २७ नक्षलवाद्यांना कंठस्थान; शोधमोहीम सुरूच
आज मृतांचा आकडा ही वाढल्याने मृतांचा एकूण आकडा 1,40,636 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ही कमी होऊन 11,847 इतकी आहे.आज 886 रुग्णांसह करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 66,25,872 झाली आहे.
हेही वाचा: अमित शहा पुणे महापालिकेत; भाजप निवडणुकीचे रणशिंग फुंकणार
कोल्हापूर,नागपूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 15,नाशिक 2,पुणे 13,औरंगाबाद 2,लातूर 1, अकोला 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 98,703 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1024 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.