Alliance Air Plane Service
sakal
जळगाव - येथील विमानतळावरून पाच शहरांसाठी विमानसेवा सुरू असून, आता मध्य भारताशीदेखील जळगावचा संपर्क दोन विमानसेवांनी होणार आहे. प्रादेशिक विमान कंपनी ‘अलायंस एअर’ विमान कंपनी दिल्ली-इंदूर-जळगाव अशी विमानसेवा २ मेपासून सुरू करत आहे. या विमानसेवेमुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याची मध्य भारत व थेट दिल्लीशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे. त्यामुळे व्यापारासोबत अन्य केंद्रांशी थेट संपर्क वाढणार असून, प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.