Tur Dal Rate : तूरडाळ 160 रुपये किलो, उन्हाळ्यात डाळी कडाडल्या

Jalgaon News : दैनंदिन वापराच्या डाळींसह कडधान्य महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून वरणाचा फोडणीला महागाईचा चटका जाणवू लागला आहे.
pulses at Bhusar market
pulses at Bhusar marketesakal
Updated on

पारोळा : दैनंदिन वापराच्या डाळींसह कडधान्य महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून वरणाचा फोडणीला महागाईचा चटका जाणवू लागला आहे. डाळी व कडधान्याचे भाव महागल्याने गृहिणींचा पालेभाज्याकडे वाढला आहे. दैनंदिन वापरात तूरडाळीचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. (Jalgaon Tur Dal 160 rupees per kg)

खिचडी फोडणीचे वरण, दाल तडका अशा विविध उपयोगात येणारी तूरडाळ तिचा भाव १५० ते १६० प्रति किलो झाल्याने बऱ्याच ठिकाणी महागाईमुळे तूरडाळीचा समावेश येतो. सध्या लग्नसराई सुरु असून विवाहाच्या जेवणात भाताबरोबर वरण देखील असते. यासाठी तूरडाळ ची आवश्यकता भासते.

मात्र बऱ्याच ठिकाणी भाववाढीमुळे वधू-वर‌ व नातेवाईक मेनू बदल करून काम भागवीत आहे. तूरडाळ बरोबर मठदाळ याने देखील शंभरी गाठली असून आज बाजारात १०० ते ११० रुपये प्रति किलो ती विकली जात आहे. तसेच हरभरा दाळ ७५ ते ८० रुपये प्रति किलो दिली जात असल्यामुळे बेसन पीठ व इतर वस्तू रेस्टॉरंट मध्ये महागल्या आहेत.

दैनंदिन वापरात एखाद्या जेवणावेळी बरोबर घरगुती भजे व पाववडे यांची चव घेत मंडळी आनंद घेत होती. मात्र दाळींचा भाव वाढल्यामुळे गृहिणींबरोबर कुटुंबप्रमुखाचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान उन्हाळ्यात सफेद उडीद दाळ पापडाचा सीझन आहे. मात्र याचा देखील भाव १३० ते १ ते १३५ झाल्याने बाजारातून रेडीमेड पापड खरेदी कडे अनेकांचा कल दिसून येतो. (latest marathi news)

pulses at Bhusar market
Jalgaon News : सीमावर्ती भागातील चेक पोस्टवर लक्ष द्या! चोपडा येथील बैठकीत सूचना

तसेच काळी उडीद दाळ प्रति किलो ११० रुपये आज बाजारात विकली जात आहे. याबरोबर मूगदाळ ११० ते १२० रुपये प्रति किलो विकली जात आहे. दरम्यान वेळोवेळी होत असलेल्या अवकाळी पाऊस गारपीट मुळे उत्पन्न कमी झाले असून मात्र मागणी जास्त झाल्यामुळे सर्वत्र डाळींचे भाव वाढ झाले आहेत. दरम्यान दैनंदिन वापरात डाळिंब बरोबर कडधान्य देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भाव वाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

"मागणी जास्त व उत्पन्न कमी झाल्यामुळे कडधान्यासह डाळींचे भाव वाढले आहेत. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल देण्यासाठी आम्ही व्यापारी प्रयत्नशील असतो." - दिनेश गुजराथी (दाळ व कडधान्य व्यापारी)

"आहारामध्ये कडधान्या सह डाळींचे समावेश असतो. मात्र भाव वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम कमी अधिक झाला आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूंचे भाव स्थिर असावेत." - सुवर्णा पाटील (पारोळा)

pulses at Bhusar market
Jalgaon News : कळमसरे येथे आज भवानीमातेचा यात्रोत्सव! नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.