Jalgaon Unmesh Patil : भाजपची बदल्याची राजनीती : उन्मेष पाटील

Jalgaon News : सततची अवहेलना स्वाभीमान दुखावणारी असल्याने स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.
Unmesh Patil
Unmesh Patilesakal

Jalgaon News : भारतीय जनता पक्षात बदला घेण्याची राजनीती अत्यंत वेदनादायी आहे. सततची अवहेलना स्वाभीमान दुखावणारी असल्याने स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले. मातोश्रीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आज श्री पाटील आणि पारोळा येथील भाजपचे युवा नेते करण पवार यांनीही शिवबंधन बांधले. (Jalgaon Unmesh Patil)

खासदार पाटील भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज होते. त्यामुळे त्यांच्यासह माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, खासदार अरविंद सावंत आदींसह जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री उद्धव ठाकरे यांनी, वापरा आणि फेकून द्या ही भाजपची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही काम करूनही तुमची किंमत केली नाही. मात्र आज तुम्ही जनमताच्या प्रवाहात आला आहात. जळगावात आमच्यासोबतही गद्दारी झाली आहे. तुमच्या प्रवेशामुळे आता जळगाव लोकसभेत शिवसेनेचा अस्सल भगवा विजयी होईल असा विश्‍वास आहे. तर खासदार उन्मेष पाटील म्हणाले, भाजपने कामाची किंमत केली नाही.

नेहमीच स्वाभिमान दुखावला. बदला घेण्याच्या भावनेनेच माझ्याशी वर्तणूक केली. आमदार म्हणून मी चांगले काम केले. खासदारकीची उमेदवारी नको असताना त्यावेळी बदला घेण्याच्या भावनेने मला उमेदवारी दिली तरीही मी विकासात्मक बदलाच्या दृष्टीने उमेदवारी स्वीकारून मोठ्या मताधिक्याने विजयी झालो. (jalgaon political news)

Unmesh Patil
Lok Sabha: काँग्रेस व भाजप कोणालाच जुमानत नाही, उबाठा, राष्ट्रवादी व शिंदे सेनेची नाराजी; रामटेकमध्ये धुसफूस

विकासाचे काम केले. गिरणा नदीच्या विकासासाठी परिक्रमा केली. पण विकासाचे राजकारण भाजप नेत्यांना मान्य झाले नाही. माझे कौतुक केले नाहीच, उलट माझी अवहेलना केली. स्वाभिमानाने राजकारण करण्यासाठी तसेच जनतेच्या विकासाच्या माध्यमातून स्वाभिमानाने कार्य करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला असून शिवसेनेची मशाल उत्तर महाराष्ट्रात तेवत ठेवणार आहे.

खासदारकीचा राजीनामा

प्रवेशापुर्वी खासदार उन्मेष चव्हाण यांनी खासदारकीचा राजीनामा लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे पाठविला आहे. त्यांनी हिंदीत, देशाच्या सतराव्या लोकसभेचे सदस्य आहोत, महाराष्ट्राच्या जळगाव लोकसभा मतदार संघाचे आपण प्रतिनिधित्व करीत आहोत. आपण या पत्राव्दारे तत्काळ लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. तो स्वीकारावा गेल्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल आपला आभारी आहे.

Unmesh Patil
Lok Sabha Election 2024 : भंडारा गोंदिया मतदारसंघात बंडखोर ठरणार डोकेदुखी? भाजप-काँग्रेसपुढे मोठं आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com