Jalgaon Unseasonal rain Damage : मेहुणबारे परिसरात अवकाळीचा कहर; गारपिटीमुळे केळी, कांद्याचे पीक जमीनदोस्त

Jalgaon Unseasonal rain Damage : अगोदरच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांवर सोमवारपासून (ता. २६) अवकाळीचे संकट कोसळल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
Damage of banana and onion crop
Damage of banana and onion cropesakal

Jalgaon Unseasonal rain Damage : अगोदरच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांवर सोमवारपासून (ता. २६) अवकाळीचे संकट कोसळल्याने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. सलग दोन दिवस गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला गेला आहे.

निसर्गाच्या या कोपामुळे जगावे तरी कसे? असा प्रश्‍न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. (unseasonal hail in Mehunbare area banana and onion crops were destroyed)

ऐन पीक जोमात असताना ते जमीनदोस्त झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आज प्रशासनाने काही भागात कालच्या नुकसानीचे पंचनामे केले असून मंगळवारी (ता.२७) पुन्हा झालेल्या नुकसानीचेही पंचनामे तत्काळ करावेत, अशी मागणी होत आहे.

मेहुणबारेसह परिसरातील धामणगाव, जामदा, भऊर, खडकीसीम, दसेगाव, लोंढे, दरेगाव, पिंजारपाडे, विसापूर, चिंचगव्हाण, कृष्णापुरी तांडा, वरखेडे तांडा, वरखेडे गाव, पळासरे, पिंपळवाडी, दहिवद भागात मंगळवारी (ता.२७) दुपारी साडेतीनच्या सुमारास चक्रीवादळ आले.

जवळपास २० ते २५ मिनिटांच्या या वादळामुळे या परिसरातील शेतांमधील पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. वादळ सुरु असताना काही भागात मोठ्‍या प्रमाणावर गारपीट झाली. ज्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, केळी, पपई, शेवगा, टरबूज, लिंबू आदींचे नुकसान झाले.

शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. वादळाचा जोर इतका अधिक होता, की शेतातील मल्चिंग पेपर फाटून काही शेतांमध्ये शेडनेट उडाले तर काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडले. (Latest Marathi News)

Damage of banana and onion crop
Jalgaon Unseasonal rain Damage : अमळनेरला पावणे चारहजार हेक्टरला फटका; भरपाईची मागणी

केळीचे अतोनात नुकसान

विहिरींना असलेल्या जेमतेम पाण्यावर ज्या शेतकऱ्यांनी केळीचे पीक जगवले होते, ती केळी देखील वादळवाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली. विशेषतः वरखेडे भागातील केळीला वादळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. या भागातील सर्वच्या सर्व केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या.

केळीचे पीक काढणीवर आलेले असतानाच होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले होते. भय्या राजपूत व राहुल पाटील यांच्या शेतातील केळी घेण्यासाठी बुधवारी (ता. २८) व्यापारी येणार होते. मात्र, त्यापूर्वीच दोन्हींच्या शेतातील केळीची झाडे उन्मळून पडली.

३२ गावांमध्ये झाले पंचनामे

सोमवारी (ता. २६) झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे ३२ गावांमधील ३ हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले असून यात ५ हजार ६५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असे असले तरी प्रत्यक्षात हा आकडा किती तरी प्रमाणात मोठा आहे. आज दिवसभर वलठाण, पाटणा, चंडिकावाडी, बेलदारवाडी, गणपूर, कोदगाव, गणेशपूर, चितेगाव, पिंप्री बुद्रूक व प्र.चा., वाघडू, तांबोळे बुद्रूक व खुर्द, निमखेडी, बाणगाव, रांजणगाव, पिंपरखेड, शिवापूर, लोंजे, आंबेहोळ.

Damage of banana and onion crop
Jalgaon News : जळगावमध्ये आजपासून महासांस्कृतिक महोत्सव

खेरडे, सोनगाव, बोढरे, सांगवी, तळोंदे, जामदा, सायगाव, अलवाडी, नांद्रा, पिंपळवाड म्हाळसा गावात पंचनामे केले. प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.

अश्रू पुसण्यासाठी शेतकरीच सरसावले

पोटच्या मुलाप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेऊन वाढवले होते. ऐन पीक हाती येत असताना नुकसान झाल्याने झालेला खर्चही निघणार नसल्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.

शेतात हे शेतकरी गेल्यानंतर नुकसानीमुळे व्यथित होऊन ते आपल्या जिवाचे काही बरे वाईट करतील, अशी भीती काहींना असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना इतर शेतकरी दिलासा देताना दिसून आले. शेतकऱ्यांना मदत मिळायची तेव्हा मिळेल. मात्र, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांना दिलेला दिलासा त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारा ठरला.

Damage of banana and onion crop
Jalgaon Unseasonal rain Damage : नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com