Jalgaon Unseasonal Rain Damage : पाचोरा परिसराला अवकाळीचा फटका

Jalgaon Unseasonal Rain Damage : शहर व परिसरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामास मोठा फटका बसला असून, प्रथमच दुष्काळ व नुकसान यामुळे ग्रासलेला बळीराजा कमालीचा खचला आहे.
Unseasonal Rain Damage (file photo)
Unseasonal Rain Damage (file photo)esakal

Jalgaon Unseasonal Rain Damage : येथील शहर व परिसरात शुक्रवारी (ता. १) झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामास मोठा फटका बसला असून, प्रथमच दुष्काळ व नुकसान यामुळे ग्रासलेला बळीराजा कमालीचा खचला आहे.

परिसरात शुक्रवारी दुपारी व सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. (Jalgaon Unseasonal Rain Damage in Pachora area)

Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon News : शहरातील रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी; रस्त्यांच्या गुणवत्तेचे यांत्रिक परीक्षण

कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, सार्वे, जामने, कुरंगी, अंतुर्ली आदी भागात जोरदार वादळी पावसामुळे हाती येण्याच्या अवस्थेतील मका, दादर, ज्वारी, बाजरी ही रब्बी हंगामाची पिके आडवी झाली.

गहू व हरभरा पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. मोहरलेल्या आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे प्रथमच नुकसानीने त्रस्त असलेल्या बळीराजा कमालीचा खचला असून, महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामे करून बळीराजाला भरपाई देऊन धीर व आधार द्यावा, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon Water Scarcity : पाणी टंचाईच्या झळा सुरू; 22 गांवाना 26 टँकरने पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com