Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात 42 गावांत पाणीटंचाई; जिल्हा प्रशासन टंचाईबाबत अलर्ट

Jalgaon : राज्यात कमी पर्जन्यामुळे अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्येच संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून तसे नियोजन केले होते.
Water Scarcity (file photo)
Water Scarcity (file photo)esakal

Jalgaon News : राज्यात कमी पर्जन्यामुळे अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्येच संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करून तसे नियोजन केले होते. आज जिल्ह्यात ४२ गावांत पाणीटंचाई असून, तिथे ५१ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात २९ गावांत ३३ टँकरने पाणीपुरवठा होत होता. आता टँकरची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. (Jalgaon Water scarcity in 42 villages in district)

"पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. जसजसे ऊन वाढेल, त्यानुसार टंचाई वाढणार, हे गृहीत धरून संभाव्य टंचाईग्रस्त गावातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे." -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

टँकर सुरू असलेली गावे

तालुका- गावे--टँकर

चाळीसगाव-- २६--३१

अमळनेर--१२--१६

भडगाव--२--२

भुसावळ--१--१

पारोळा--१--१

Water Scarcity (file photo)
Jalgaon Lok Sabha Election : ‘मविआ’तर्फे जळगावातून करण पवार? भाजपला धक्का देण्यासाठी ‘उबाठा’ गटाकडून जोरदार हालचाली

५९ गावांसाठी ६५ विहिरीचे अधिग्रहण

चाळीसगाव तालुक्यातील २२ गावांतील २६, अमळनेर तालुक्यातील १३ गावांत १४, भडगाव तालुक्यातील तीन गावांसाठी तीन, भुसावळ तालुक्यातील दोन गावांत दोन, पारोळा तालुक्यातील चार गावांत चार, पाचोरा तालुक्यात तीन गावांना तीन, धरणगाव तालुक्यातील ९ गावांत १०, तर जामनेर तालुक्यातील तीन गावांत तीन विहिरीचे अधिग्रहण, अशा ५९ गावांत ६५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जि.प.कडून टंचाईसाठी कृती आराखडा

जळगाव जिल्हा परिषदेकडून टंचाईच्या पार्श्वभूमीवर २०२३-२४ साठी ५९२ गावांसाठी ९ कोटी ९० लाख ७४ हजार रुपयाचा संभाव्य कृती आराखडा तयार केला आहे. टंचाईची परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी ‘दुष्काळ तपासणी समिती’ गठित केली असून, ही समिती तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत उपलब्धतेची तपासणी करणार आहे.

मनरेगांतर्गत ९१ कामे सेल्फवर

जिल्ह्यात टंचाईच्या काळात ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत कामाची मागणी करतील, तसे ‘मनरेगा’ची कामे सुरू असून, ९१ हजार ३९६ एवढी कामे सेल्फवर आहेत. त्यामुळे मनरेगा अंतर्गत मागेल त्याला काम मिळेल, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Water Scarcity (file photo)
Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेश पाटील, करण पवारांच्या पक्षांतराबद्दल नेते अनभिज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com