Jalgaon News : नागझिरी पुलाचे काम सुरू होण्याआधीच थांबले

Jalgaon : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथील बहुचर्चित नागझिरी नाल्यावरील जुना सावदा रस्त्यावर नवीन पूल बांधण्याचे काम शनिवारी (ता. १६) सकाळी सुरू झाले.
Commencement plaque on Nagziri river and JCB on duty.
Commencement plaque on Nagziri river and JCB on duty.esakal

Jalgaon News : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथील बहुचर्चित नागझिरी नाल्यावरील जुना सावदा रस्त्यावर नवीन पूल बांधण्याचे काम शनिवारी (ता. १६) सकाळी सुरू झाले; मात्र कामाचा कार्यारंभ आदेशच मिळाला नसल्याने दुपारी ठेकेदाराने आपले सामान उचलून परत नेत काम बंद केले आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रावेरकरांच्या नशिबी पुन्हा प्रतीक्षाच आली आहे. नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Jalgaon work of Nagziri bridge was stopped before it started)

गेल्या पावसाळ्यात शहरातील नागझिरी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे जुना सावदा रोड भागातील पुलाचा काही भाग खचून माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील हे त्या पुरात वाहून गेले होते. त्यानंतर या पुलाची उंची वाढविण्याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रावेर येथे दिलेल्या दोन्ही भेटीच्या वेळेस आठवड्यातच काम सुरू करण्याची माहिती पत्रकारांना दिली होती. मात्र सहा महिन्यानंतर ही हे काम सुरू होण्याची रावेरकरांना प्रतीक्षाच आहे.

आज (ता. १६) सकाळी नऊला या पुलाची उभारणी सुरू होण्याचे संकेत रावेरवासीयांना मिळाले. पुलाचे बांधकाम सुरू होत असल्याबाबतचे आणि नवीन सावदा रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करणारे फलक या भागात लागला आणि ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्याने काम सुरू देखील झाले. मात्र दीड, दोन तासातच पुन्हा या ठिकाणी सामसूम झालेली दिसून आली.

या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिल्याची माहिती ‘सकाळ’ला सूत्रांनी दिली आहे. मात्र कामाचा कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) न देताच काम सुरू करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. (latest marathi news)

Commencement plaque on Nagziri river and JCB on duty.
Jalgaon News : सुरक्षारक्षक परवाना नसातना वनविभागाचे एजन्सीला कंत्राट

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे काम जिल्हा परिषदेकडून मंजूर झाले असून, त्यांच्याकडूनच निधी उपलब्ध होऊन खर्च होईल, अशी माहिती मिळाली. मात्र काम सुरू झालेल्या ठिकाणी फलक सार्वजनिक बांधकाम विभागाचा लागला होता, हे विशेष! या पुलाचे काम नक्की कोण करणार आहे.

हे देखील स्पष्ट होण्याची गरज आहे. आता मार्च महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपला आहे. सुमारे दोन, अडीच महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल. इतक्या कमी वेळेत पुलाचे पिलर्स उभे राहून त्यावर स्लॅब टाकणे वेळेअभावी अवघड झाले आहे.

नुसताच देखावा; नागरिकांमधून संताप

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रावेरकरांची नाराजी ओढवू होऊ नये म्हणून या पुलाचे बांधकाम सुरू झाल्याचा देखावा करण्यात येत असल्याचा संतापही या खचलेल्या पुलावरून ये-जा करणारे नागरिक व्यक्त करीत आहेत. या आठवड्यात कामाची वर्क ऑर्डर मिळाली तरच ठेकेदाराला युद्धस्तरावर काम सुरू करून ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे लागेल; अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यातही जीव मुठीत घेऊनच पुलावरील खचलेल्या रस्त्यावरून ये-जा करावी लागेल, हेही तितकेच खरे.

Commencement plaque on Nagziri river and JCB on duty.
Jalgaon Summer : बदलत्या हवामानाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम; नाकातून रक्तस्रावासह विविध विकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com