Jalgaon News : मालेगावच्या सैफ अलीने गाजविला आखाडा

Jalgaon : शेरे हिंद टिपू सुलतान आखाडातर्फे लोकसेवक मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले. या सामन्यांना पहिलवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
wrestling
wrestling esakal

Jalgaon News : येथे शेरे हिंद टिपू सुलतान आखाडातर्फे लोकसेवक मधुकरराव चौधरी क्रीडा संकुलात शुक्रवारी (ता.२३) करण्यात आले. या सामन्यांना पहिलवानांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगन सोनवणे व फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुरबान यांच्या हस्ते कुस्तीची जोड लावून उद्घाटन करण्यात आले. (Wrestling was won by Saif Ali Pahalwan from Malegaon)

या वेळी डायमंड स्कूलचे अध्यक्ष हारुन सेठ, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ, उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, दोस्तांना पंपचे संचालक हमीद शेख, शेख इलियास, माजी उपनगराध्यक्ष कलीम खां मन्यार, आरिफ शेख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक, ॲड. नितीन भावसार आदी उपस्थित होते.

दरम्यान, या कुस्त्यांमध्ये मालेगाव, येवला, खंडवा, बऱ्हानपूर, महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, हरियाना येथील शंभरपेक्षा जास्त पहिलवान सहभागी झाले होते. मानाची कुस्ती मालेगाव येथील सैफ अली पहिलवान यांनी जिंकली.

wrestling
Jalgaon News : सावदा, किनगाव येथील रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

ही लढत मालेगावचा सैफ अली पंजाबी व येवला येथील गणेश राजपूत यांच्यात रंगली. सुमारे पंधरा मिनिटांच्या लढतीमध्ये सैफ अली पहिलवानाने विजय मिळवला. सैफ अली याला २१ हजार रुपये रोख बक्षीस व गदा देऊन बक्षीस म्हणून देण्यात आला.

कुस्त्यांचे परीक्षक म्हणून निवृत्त पोलिस शकील शेख व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नासीर होते. या कुस्त्यांचे आयोजन आवेश भांजा, अख्तर पहिलवान, फारुक शेख, वसीम जनाब, शेख आसिफ, कामील पहिलवान, निसार तडवी, इस्माईल शेख, बुरहान तडवी यांनी केले होते.

हाजी खलिल यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ, उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, उपनिरीक्षक मोहन लोखंडे यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

wrestling
Jalgaon News : सावदा, किनगाव येथील रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com