जळगाव : प्रेमात झालेल्या फसवणुकीमुळे मानसिक तणावात गेलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये. अमळनेर तालुक्यातील गांधली गावातील गौरव बोरसे (वय अंदाजे २२) याने आत्महत्या करण्यापूर्वी एक भावनिक व्हिडिओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.