SAKAL Exclusive : झटपट कर्जे अमाप, तरुणाई कर्जाच्या विळख्यात; एका क्लिकवर पैशाची उचल

Jalgaon News : कर्जासाठी बँकेत ओळख, दोन जामीनदार, सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी मागे पडून मोबाईलच्या एका क्लिकवर झटपट कर्जाचा फंडा सुरू झाला आहे.
Instant Loan
Instant Loanesakal

Jalgaon News : कर्जासाठी बँकेत ओळख, दोन जामीनदार, सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी मागे पडून मोबाईलच्या एका क्लिकवर झटपट कर्जाचा फंडा सुरू झाला आहे. यामुळे कर्जाउ रक्कमा उचलण्याची चटक लागली आहे. १८ ते ३६ टक्के व्याजाचा ससेमिरा घेऊन वसुली कर्मचारी दारात धडकतात तेव्हाच आपल्या पोराने एवढे कर्ज घेतले आणि त्याचे व्याजासह रक्कम एवढी असल्याचे ऐकून कुटुंबियांना धक्का बसत आहे. (Jalgaon Youth in debt trap cause of instant loan)

एक हजार रुपयांचे कर्ज घ्या, ते फेडा. पुढील कर्ज पाच हजार घ्या ते फेडा अशा रक्कम वाढत जाऊन तीस हजारापर्यंतचे पर्सनल लोन सहजपणे मिळवा. अशा चक्रात तरुणाई गुरफटत चालल्याचे दिसून येते. शहरातील अनेक गरीब व मध्यम वस्तीत याचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे. वसुली करणारे दारात उभे राहल्यानंतर अनेक कुटुंबीयांच्या तोंडचे पाणी पळते. त्यातून वादावादीचे प्रकार घडत आहे.

परत फेडीची खात्री काय ?

केवळ दोन कागदपत्रांच्या आधारे कंपन्यांचे कर्मचारी कर्जे वाटप करीत आहेत. यातून चैनीसाठी अशा कर्जे उचलणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कर्जाची परतफेड करण्याचे उत्पन्नाचे मार्ग नसल्यांना अशी खिरापत वाटून या कंपन्यांनी मात्र आपली उद्दिष्ठ साध्य केल्याचे चित्र आहे.

पाच मिनिटांत कर्ज

त्वरित कर्जे देताना अवघ्या पाच मिनिटांत जलद आणि पेपरलेस कर्जाची रक्कम ग्राहकाला दिली जात आहे. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने व्यवहार करून कर्ज पुरवले जाते आहे. १२ महिन्यांच्या कालावधीसाठी ३० ते ३६ टक्के व्याजाने आपण हे कर्ज घेत असल्याची समोरच्याला पुसटशी कल्पनाही नसते. (latest marathi news)

Instant Loan
Jalgaon News : अमळनेरला पंचायत समितीची ग्रीन बिल्डींग : मंत्री अनिल पाटील

पालकांच्या अपरोक्ष युवावर्ग, काही महिला परस्पर अशी कर्जे उचलत आहेत. त्यांच्या या व्यवहाराची कोणतीच कल्पना घरच्यांना नसते. अशावेळी वसुलीसाठी येणाऱ्यांना कुटुंबीयांना तोंड द्यावे लागत आहे. या पैशांचा मुलाने कशासाठी वापर केला, हे विचारण्याऐवजी पालक प्रतिष्ठेपोटी ही कर्जे स्वतः च परत फेड करताना दिसतात.

"युवकांनी झटपट लोन देणारे किती टक्के व्याज दरात कर्ज देताहेत त्या दराचा करार करून घ्यावा. कर्ज वसूलीसाठी अगोदर कर्जदाराला नोटीस देणे, न्यायालयातून वसूली दाखला मिळविणे गरजेचे असते. त्याशिवाय वसुली करता येत नाही. युवकांनी या नियमांची माहिती करून घ्यावी. झटपट कर्ज मिळविण्यात आपली फसवणूक होत नाही ना याची खात्री करून घ्यावी."- ॲड. हरूल देवरे, जिल्हा वकील संघ, सदस्य महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल

Instant Loan
Jalgaon News : मुक्ताईनगर तालुक्यातून महामार्ग नेण्यास विरोध; अंतुर्लीच्या शेतकऱ्यांची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com