Letast Marathi News | Jalgaon : चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abuse of a girl child

Jalgaon : चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट येथे १० वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जळगाव जिल्हा न्यायालयाने शनिवारी (ता. १७) हा निर्णय दिला.(jalgoan child abuse Imprisonment life till death District Court)

जळगाव शहरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या १० वर्षीय गतिमंद मुलीवर सौरभ वासुदेव खर्डीकर (वय २६, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) याने १० जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजता शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडीस आला होता. या संदर्भात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्याचा खटला जळगाव न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीची साक्ष व रेखाचित्र काढणारे चित्रकार आणि वैद्यकीय अधिकारी तसेच सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या ठरल्या.

हेही वाचा: ATM कार्ड बदलून घातला तरुणाला गंडा

साक्षीपुराव्या अंती न्यायालयाने सौरभ खर्डीकर याला दोषी ठरवत विविध कलमान्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि ७० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून किरण पाटील व विजय पाटील यांनी सहकार्य केले.

हेही वाचा: Kirankumar Bakale case : बकाले जात्यात...अन्य अधिकारी सुपात!

Web Title: Jalgoan Child Abuse Imprisonment Life Till Death District Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..