Market Committee Election : जामनेरला भाजप महाविकास आघाडी समोरासमोर; बाजार समितीसाठी काटे की टक्कर

Mahavikas Aghadi and BJP
Mahavikas Aghadi and BJPesakal

Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार माघारीनंतर अंतिम नावे जाहीर होऊन निवडणुकीत आता भाजप आणि आघाडीची समोरासमोर लढत पाहायला मिळणार आहे. (Jamner Market Committee Election BJP Maha Vikas Aghadi will be competing against each other jalgaon news)

दरम्यान, भाजपचा आधीच १८ पैकी एक उमेदवार (तुकाराम निकम - हमाल मापारी मतदारसंघ) बिनविरोध निवडला गेला आहे, तर व्यापारी मतदारसंघातून दोन उमेदवार देण्याच्या ठिकाणी आघाडीला एकच उमेदवार मिळाल्याने आणखी एक जागा आपोआपच भाजप आपल्या पदरात पाडून घेणार असल्याचे दिसते. त्यामुळे आता फक्त १६ जागांवरच निवडणूक होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

ज्ञानेश्वर पाटील, प्रमिलाबाई पाटील, कविता भगत, शैलेश पाटील, युवराज पाटील, योगेश बनकर, चरणदास पवार, अॅड. ज्ञानेश्वर बोरसे, शिवाजी पाटील, धोंडू पाटील, अॅड. राजू मोगरे, किशोर पाटील, सीताराम इंगळे, मयूर पाटील, रघुनाथ पाटील, अमोल पाटील (सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार) तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांमध्ये धनराज चव्हाण,

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Mahavikas Aghadi and BJP
Jalgaon Market Committee Election : भाजप, शिंदे गट विरुध्द ‘मविआ’त लढत!

तुकडुदास नाईक, सुभाष पाटील, शिवाजी पाटील, सुभाष शिनगारे, पदमाकर पाटील, महेश देशमुख, राजमल भागवत, अशोक पाटील, दिलीप गायकवाड, वासुदेव घोंगडे, चंद्रशेखर काळे, सुनील कलाल, संगीताबाई पाटील, उज्ज्वलाबाई वाघोडे, अशोक भोईटे, संजय देशमुख असे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या पॅनलचे नेतृत्व अर्थातच राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन हे स्वतः आणि त्यांचे विश्वासू पदाधिकारी-कार्यकर्ते करीत आहेत तर महाविकास आघाडीची धुरा संजय गरूड, डी. के. पाटील, अॅड. बोरसे, किशोर पाटील, विलास राजपूत आदींच्या खांद्यावर असल्याचे समजते. गेल्या पंधरा वर्षांपासून बाजार समितीची सत्ता भाजपच्या ताब्यात आहे. यावेळी आघाडीकडून संस्था ताब्यात घेण्यासाठी कोणते डावपेच आखले जातात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Mahavikas Aghadi and BJP
Amalner Market Committee Election : 85 जणांची माघार; 2 उमेदवार बिनविरोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com