Jalgaon News : शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी ,विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

Student Injured News
Student Injured Newsesakal

जामनेर : शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी अचानक शाळा आवारातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तिच्या कंबरेला व पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी (ता.१०) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. घटनेबाबत तर्कवितर्क लढविले जात असून, विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शहरातील श्रीराम पेठेतील रहिवासी टिना सतीश तुळसकर असे जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती नववी (तुकडी आय) मध्ये शिकत आहे. वर्गातील शेवटचा तास साडेअकराला होता. त्यामुळे शिक्षक येण्याच्या अगोदर वर्गासमोर असलेल्या गॅलरीत मुले -मुली उभे होते. त्यावेळी टिना ही देखील उभी होती. (Jamner New English School under student seriously injured after falling from third floor of school ignore student safety is on agenda Jalgaon News)

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

Student Injured News
Jalgaon News : वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणाने भरले; पदाधिकारी, नगरसेवकांचाही आशीर्वाद?

अचानक तिचा तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला तिच्या पालकांच्या मदतीने शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तपासणी केल्यानंतर तिच्या कंबरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

"घटना घडताच आरडाओरड सुरू झाल्याने आजूबाजूच्या वर्गातील शिक्षक, कर्मचारी घटनास्थळी पोचले. मीही लागलीच पोहचले. तिथे ती माझ्याशी बोलली. तिला शेजारच्या खासगी दवाखान्यात नेले. तेथून स्थानिक हाडांच्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला रुग्णवाहिकेतून जळगाव येथे नेण्यात आले."

- पी. एन. नरवाडे, मुख्याध्यापिका, न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर

Student Injured News
Nashik News : उद्यानातील खेळण्या चोरट्यांकडून लंपास; मृत्युंजय महादेव मंदिर उद्यानाची दुरवस्था!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com