esakal | जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!
sakal

बोलून बातमी शोधा

Ward Committee Chairman

जळगाव मनपात बंडखोर नगरसेवकांचा पून्हा भाजपला दे धक्का!

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः येथील महापालिकेच्या (Jalgaon Municipal Corporation) प्रभाग समिती सभापतिपदी (Ward Committee Chairman) अखेर भाजपमधून (BJP) शिवसेनेत (Shiv Sena) आलेल्या चार बंडखोर नगरसेवकांची (Corporator)निवड झाली आहे. यामुळे भाजपचला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे आता चारही प्रभाग समिती पदावर वर्चस्व आले आहे. (jmc shiv sena corporator ward committee chairman selection )

हेही वाचा: दौरा एक..नेते, गटबाजी अन्‌ प्रश्‍नही अनेक!

प्रभाग समिती सभापती निवडीची प्रक्रिया आज पिठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी, अभिजीत राऊत उपस्थित होते. उपायुक्त विद्या गायकवाड नगरसचिव सुनिल गोरोणे यावेळी उपस्थित होते. प्रभाग एकमध्ये सचिन पाटील यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले. प्रभाग दोनमध्ये प्रवीण कोल्हे विजयी झालेत. त्यांना १३ मते तर त्यांचे विरोधक मुकुंदा सोनवणे यांना ७ मते पडली. प्रभाग तीनमध्ये रेखा चुडामन पाटील विजयी झाल्या. त्यांना १० तर त्यांचे विरोधक धीरज सोनवणे यांना ९ मते पडली. प्रभाग ४ मध्ये शेख हसीनबी शेख शरीफ हे विजयी झालेत. त्यांना १० तर विरोधक उषाबाई संतोष पाटील यांना ६ मते मिळाली. विजयानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी व बंडखोर नगरसेवकांनी जल्लोष करण्यात आला.

हेही वाचा: पंजाबचे जालंधर शहर पर्यटनासाठी आहे खास; जाणून घ्या माहिती

निवडीनंतर जल्लोष करण्यात आला. महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, विरोधी गटनेते सुनिल महाजन, भाजप बंडखोर गटाचे गटनेते ॲड.दिलीप पोकळे आदी यावेळी उपस्थित होते. ‘जय भवानी... जय शिवाजी....च्या घोषणांनी सतरा मजलीचे प्रांगण दणाणले होते. यावेळी फटाक्यांची आतीश बाजी करण्यात आली.

आज चारही समिती सभापतींची लोकशाही पध्दतीने निवड झाली आहे. प्रभाग तीनमध्ये चुरशीची निवड झाली. एका मताने आमच्या उमेदवाराचा विजय झाला. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर आमचा हा मोठा विजय आहे.
महापौर जयश्री महाजन

हेही वाचा: ईडी झाली येडी..जळगावात राष्ट्रवादीचे ईडीच्या विरोधात आंदोलनसत्याचा नेहमी विजय होतो हे आजच्या निवडणुकीवरून सर्वांच्याच लक्षात आले असेल. गटनेते ॲड.दिलीप पोकळे यांनी काढलेल्या व्हीपनूसार मतदार झाले. यापुढील सर्वच पदाच्या निवडणूका याच पध्दतीने घेवू.
उपमहापौर कुलभूषण पाटील

loading image