esakal | ईडी झाली येडी..जळगावात राष्ट्रवादीचे ईडीच्या विरोधात आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

ncp movement

ईडी झाली येडी..जळगावात राष्ट्रवादीचे ईडीच्या विरोधात आंदोलन

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः भोसरी जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे ( NCP leader Eknath Khadse)यांच्यावर ईडीतर्फे (ED) राजकीय दबावातून (Political Pressure) वारंवार चौकशी करण्याची कारवाई केली जात असे आरोप करीत ईडीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress) आज करण्यात आला. तसेच यावेळी ईडी झाली येडी..आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय ( Jalgaon Collector's Office) परिसर दाणाणून निघाला.

(support of eknath khadse ed against ncp movement)

हेही वाचा: रावेरमध्ये नकली नोटा चलणात आणणारे रॅकेटवर पोलिसांची धडक कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेवर राजकीय अकसापोटी होणारी ईडीकडून कडून कारवाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यात मुक्ताईनगर सह जळगाव शहरात आज आंदोलन करण्यात आले. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, कल्पना पाटील, वाल्मीक पाटील, विनोद देशमुख, अशोक लाडवंजारी, बंडू भोळे, स्वप्नील नेमाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ईडीच्या कारवाईबाबत निषेध केला.

ncp movement

ncp movement

राजकीय दबावातून ईडीची चौकशी

जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यावेळी म्हणाले, की राजकीय दबावातून एकनाथराव खडसेंवर ईडीकडून नेहमीच चौकशीचा त्रास दिला जात आहे. यापूर्वी केलेल्या चौकशीत ते निदोर्ष असतांना देखील राजकीय दबावातून पून्हा चौकशी करून त्यांना व त्यांच्या कुटूंबीयांना त्रास दिला जात आहे.

हेही वाचा: बापाच्या डोळ्यादेखत..मुलाचे गेले प्राण

सत्याचा विजय होणार

माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले, की एकनाथ खडसेंना झोटींग समितीकडून निर्दोष असल्याचे क्लिन चिट दिली आहे. तरी मुद्दाम या प्रकरणात राजकीय दबावातून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे किती ही चौकश्या लावल्या तरी सत्याचा विजय होणार असे श्री. देवकर म्हणाले.

ncp movement

ncp movement

मुक्ताईनगरमध्ये मोर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष मुक्ताईनगरतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यलय ते तहसील कार्यालय मोर्चा काढून मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन दिले. ही चौकशी सूडबुद्धीने करण्यात असल्या कारणाने या चौकशीचा निषेध व्यक्त करण्यात आला. हा प्रकार थांबला नाही तर आगामी काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील, प. स. सभापती सुवर्णा साळुंखे, प्रवक्ता सेल रावेर लोकसभा प्रमुख विशाल महाराज खोले आदी पदाधिकारी व असंख्य काययर्कर्ते उपस्थित होते.

loading image