Jalgaon News : आधी बैठकीतील इतिवृत्तात ओके नंतरच होणार रस्ता; मनपा, बांधकाम विभागास सूचना

Excavation done by municipality on the newly constructed road in the city.
Excavation done by municipality on the newly constructed road in the city. esakal

Jalgaon News : कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या नव्या रस्त्यांवर महापालिका या ना त्या कारणाने खोदकाम करते. त्यामुळे रस्त्याची पुन्हा वाट लागत असल्याचा अनुभव नित्याचाच झालाय. ( joint meeting will be held between municipal corporation and engineers of pwd before preparing road jalgaon news)

त्यासाठी आता महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची रस्ता तयार करण्याआधी संयुक्त बैठक होणार असून, त्याचे इतिवृत्तही नोंदले जाणार आहे.

विशेष म्हणजे, या बैठकीवर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. स्वत: जिल्हाधिकारी त्यांच्या अथवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही बैठक कंडक्ट करतील. त्यामुळे नव्याने तयार होत असलेल्या रस्त्यांवर जेसीबी चालविणे बंद होईल, अशी अपेक्षा आहे.

रस्त्यांची कामे खोळंबली

गेल्या सात-आठ वर्षांत जळगाव शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयार गटार योजनेसाठी अख्ख्या जळगाव शहरातील रस्ते खोदले गेले. नंतर या रस्त्यांची दुरुस्ती, नव्याने निर्मिती दोन वर्षांपासून रखडली आहे. निधी मंजूर असूनही काही ना काही कारणाने रस्त्यांची कामे खोळंबली.

तयार रस्त्यांवर खोदकाम

शहरातील असंतोष लक्षात घेता आता बऱ्याच ठिकाणी नव्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकणे, जोडकाम, व्हॉल्व्ह जोडणी अशा विविध कामांसाठी या तयार रस्त्यांवर खोदकाम सुरूच आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Excavation done by municipality on the newly constructed road in the city.
MGNREGA Scheme : ‘रोहयो’त आता फळबाग, फुलपिक लागवड करता येणार!

याशिवाय, भुयारी गटार, चेंबर दुरुस्ती या कामांसाठीही रस्ते खोदले जात आहेत. सध्या ४२ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या विविध रस्यांवर मनपाने जवळपास ५५ ठिकाणी खोदकाम केल्याने या तयार रस्त्यांची पुन्हा वाट लागली.

आता रस्ता होण्याआधी बैठक

महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व मक्तेदार एजन्सी या तीनही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने हा प्रकार होत असून, त्यामुळे नाहक नागरिक हैराण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही नव्या रस्त्याचे काम हाती घेण्याआधी या तीनही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होईल. बैठकीचे इतिवृत्त नोंदले जाईल. त्यात तीनही यंत्रणांनी ‘ओके’ दिल्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे ठरले आहे. जिल्हाधिकारी स्वत: या व्यवस्थेवर लक्ष ठेवून असतील.

अभियंत्यांनी हजर राहावे

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत शहरातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा, गुणवत्ता राहावी म्हणून मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष काम सुरू असताना त्याठिकाणी हजर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. मनपा व बांधकाम विभागाचे अभियंते याकामी गंभीर होतील, अशी अपेक्षा आहे.

Excavation done by municipality on the newly constructed road in the city.
Marathi Sahitya Sammelan : अमळनेरात तब्बल 72 वर्षांनी भरणार साहित्याचा मेळा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com