Latest Marathi News | k. k. Girls शाळेत कुकरचा स्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: Crowd of parents and residents outside the school

Jalgaon News : k. k. Girls शाळेत कुकरचा स्फोट

जळगाव : शहरातील भिलपुरा-इस्लामपुरा भागातील के. के. गर्ल्स हायस्कूलमध्ये शालेय पेाषण आहार बनविताना अचानक नवीन कुकरचा स्फोट झाला. सुदैवाने यात कुठल्याही विद्यार्थिनीस किंवा स्वयंपाकींना इजा झाली नाही.

के. के. गर्ल्स हायस्कूलमध्ये मंगळवारी (ता. २२) दुपारी शालेय पोषण आहार शिजवला जात होता. साबेराबाई आणि रजियाबाई स्वयंपाक घरात काम करीत असताना, अचानक खिचडीच्या कुकरचा स्फोट झाल्याने प्रचंड आवाज होऊन एकच गोंधळ उडाला.(k. k. Cooker explosion at Girls school Jalgaon News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Jalgaon Crime News : चोपड्याच्या चोरट्यांकडे नाशिकच्या दुचाकी

घटनेची माहिती कळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पथक आणि जिल्‍हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी धडकले.

तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून स्फोट झालेला कुकर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. तांत्रिकी त्रुटीमुळे कुकरचा स्फोट झाल्याचे प्राथमिक पाहणीत निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: Jalgaon News : ठेवी परत करण्यासाठी लवकरच पॅकेज; सहकारमंत्री अतुल सावे

टॅग्स :Jalgaonschool