Jalgaon KBCNMU Award 2023 : ‘केसीई’चे आयएमआर महाविद्यालय उत्कृष्ट; ‘उमवि’चे पुरस्कार जाहीर

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon KBCNMU Award 2023 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे २०२१-२२ चे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी-कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले असून, ११ ऑगस्टला विद्यापीठ नामविस्तार दिनी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

पुरस्कारांत उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून केसीई सोसायटीच्या ‘आयएमआर’ने बाजी मारली; तर प्राचार्यांमधून चाळीसगावचे डॉ. मिलिंद बिल्दीकर उत्कृष्ट ठरले. (kbcnmu has announced best colleges, principals teachers and officers staff awards for year 2021 22 jalgaon news)

विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात शुक्रवारी (ता. ११) विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी असतील. याच समारंभात राज्यस्तरावरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हेमचंद्र पाटील यांनाही दिला जाणार आहे.

असे आहेत पुरस्कार

उत्कृष्ट प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर (चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. आर्ट्‌स, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव), उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) डॉ. मनोजकुमार चोपडा (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), डॉ. सुनील गोसावी (चं. ह. चौधरी कला, शं. गो. पटेल वाणिज्य व भ. जा. पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार), उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ) डॉ. रत्नमाला बेंद्रे (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), उत्कृष्ट महाविद्यालय/परिसंस्था के.सी.ई. संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च (व्यावसायिक),

बोदवड संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (अव्यावसायिक), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग-१) जी. एन. पवार (उपकुलसचिव, संलग्नता विभाग), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग) मनोज भावसार (कक्ष अधिकारी, प्रशासन विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग-३) अरुण सपकाळे (वरिष्ठ सहाय्यक, प्रशासन विभाग), प्रकाश लंगोटे (सहाय्यक, कुलगुरू कार्यालय), सुनील नेमाडे (कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग), उत्तेजनार्थ कैलास औटी (वरिष्ठ सहाय्यक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग),

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : ‘उमवि’तील व्यवस्थापनशास्त्र प्रवेश परीक्षा 10 ऑगस्टला

उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग-४) भागवत थोरात (कुशल परिचर, अतिथीगृह), शिरीष मोरे (शिपाई, प्र-कुलगुरू कार्यालय), महेश मानेकर (शिपाई, कुलसचिव कार्यालय), उत्तेजनार्थ श्रीमती कांचन देशमुख (प्रयोगशाळा परिचर, स्कूल ऑफ कॉम्‍प्युटर सायन्सेस), उत्कृष्ट अधिकारी (महाविद्यालय वर्ग-२) जयराम चौधरी (कार्यालय अधीक्षक, गि.द.म. कला, श्री. के.रा.न. वाणिज्य आणि म.धा. विज्ञान महाविद्यालय, जामनेर),

उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग-३) सुभाष तळेले (वरिष्ठ लघुलेखक, मू. जे. महाविद्यालय, जळगाव), वसंत गवई (प्रयोगशाळा सहाय्यक, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), राजेश गुजर (लिपिक, आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेश रिसर्च, शिरपूर), रवींद्र सूर्यवंशी (प्रयोगशाळा सहाय्यक, जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग-४) जितेंद्र परदेशी (प्रयोगशाळा परिचर,

पी. आर. हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव), विजय जावळे (शिपाई, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), हरी बेडसे (प्रयोगशाळा परिचर, सी. गो. पाटील महाविद्यालय, साक्री), दिनेश शिंदे (प्रयोगशाळा परिचर, पीएसजीव्हीपीएमचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा).

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : ‘उमवि’त कौशल्य विकासाचे 67 नवीन कोर्सेस; ‘एमकेसीएल’शी सामंजस्य करार

विद्यापीठ शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (निधी)

डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि), प्रा. एस. टी. इंगळे (प्र-कुलगुरू, कबचौउमवि, जळगाव), प्रकाशन पुरस्कार- प्रा. डी. एच. मोरे (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि), प्रा. रत्नमाला बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), प्रा. पी. पी. माहुलीकर (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), डॉ. सतीश पाटील (जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), प्रा. विकास गिते (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), पेटंट पुरस्कार- डॉ. आर. जे. रामटेके (संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि).

महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (निधी)

डॉ. कैलास मोरवकर (आर. सी. पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, शिरपूर), डॉ. विनोदकुमार उगलेप (आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, शिरपूर), डॉ. पंकज नेरकर (आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, शिरपूर), प्रकाशन पुरस्कार डॉ. मधुचंद्र भुसारे (महात्मा गांधी शिक्षणप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), डॉ. वसीम शेख (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव).

पेटंट पुरस्कार

डॉ. कुणाल गायकवाड (महात्मा गांधी शिक्षणप्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), डॉ. सुनील गोसावी (चं. ह. चौधरी कला, शं. गो. पटेल वाणिज्य व भ. जा. पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार), डॉ. मोहम्मद रागीब मोहम्मद उस्मान (शरदचंद्रिका पाटील फार्मसी महाविद्यालय, चोपडा).

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : बी.एस्सी. कॉम्प्युटरसह बीसीए प्रवेशसंख्या वाढ; ‘उमवि’च्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

उत्कृष्ट केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प राबविणारी महाविद्यालये व समन्वयक

जळगाव जिल्हा : पी. ओ. नाहटा महाविद्यालय (भुसावळ), समन्वयक- प्रा. भोजराज बऱ्हाटे (पी. ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ), किसान महाविद्यालय (पारोळा), समन्वयक- प्रा. अनिरुद्ध देवरे (किसान महाविद्यालय, पारोळा), डी. एन. भोळे महाविद्यालय (भुसावळ), समन्वयक- प्रा. दीपककुमार जयस्वाल (किसान महाविद्यालय, पारोळा), धनाजी नाना महाविद्यालय (फैजपूर), समन्वयक- डॉ. हरीश नेमाडे (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर), लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय (फैजपूर), समन्वयक- प्रा. मयूर नारखेडे (लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर).

धुळे जिल्हा : आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (शिरपूर), समन्वयक- प्रा. संजय बच्छाव (आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर), झेड. बी. पाटील महाविद्यालय (धुळे), समन्वयक- प्रा. धनंजय पाटील (झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे), एसपीडीएम महाविद्यालय (शिरपूर), समन्वयक- प्रा. संदीप सोलंकी (एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर),

नंदुरबार जिल्हा : पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (शहादा), समन्वयक- प्रा. विशाल भोसले (पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा), जी.टी.पी. महाविद्यालय (नंदुरबार), समन्वयक- डॉ. स्वप्नील मिश्रा (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार), चं. ह. चौधरी कला, शं. गो. पटेल वाणिज्य व भ. जा. पटेल विज्ञान महाविद्यालय (तळोदा, जि. नंदुरबार), समन्वयक- डॉ. गौतम मोरे (चं. ह. चौधरी कला, शं. गो. पटेल वाणिज्य व भ. जा. पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार).

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon NMU News : ‘उमवि’-कृषि विज्ञान केंद्रात सामंजस्य करार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com