Jalgaon News : जळगावात शनिवारपासून खानदेश पापड महोत्सव

Papad
Papad Esakal

Jalgaon News : गेल्या १४ वर्षांची परंपरा यंदाही कायम राखत जळगाव जनता बँक व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्यातर्फे खानदेश पापड महोत्सव १५ ते १७ एप्रिलदरम्यान होणार आहे. (Khandesh Papad Festival in Jalgaon from 15 april jalgaon news)

सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत लेवा बोर्डिंग सभागृहात प्रदर्शन व महोत्सव होईल. शनिवारी (ता. १५) सकाळी अकराला उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या हस्ते पापड महोत्सवाचे उद्‌घाटन होईल.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Papad
Jalgaon News : महामार्गावर दर्शनी भागात वेग मर्यादेचे फलक लावावे : जिल्हाधिकारी मित्तल

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीकांत झांबरे, बँकेचे संचालक सतीश मदाने, हरिश्चंद्र यादव, ललित चौधरी, सुशील हासवाणी, हिरालाल सोनवणे, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, संध्या देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील आदी उपस्थित राहतील. महोत्सवात ५० बचत गटांचा सहभाग असून, पापड, कुरडई, नागली पापड, शेवया, हातशेवया, उपवास पापड, मुखवासाचे विविध प्रकार, नैसर्गिक प्रकारची हळद आदी पदार्थ उपलब्ध असतील.

Papad
Gharkul Scheme Case : 2 वर्षांहून अधिक शिक्षा, 4 नगरसेवक अपात्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com