Jalgaon Crime News : हॉटेल कस्तुरी जवळून विद्यार्थिनीचे अपहरण; MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minor girl kidnapped

Jalgaon Crime News : हॉटेल कस्तुरी जवळून विद्यार्थिनीचे अपहरण; MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव : शहरातील बेंडाळे महाविद्यालयात अकरावीच्या परिक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेली विद्यार्थिनी हॉटेल कस्तुरी येथून रिक्षात बसली, मात्र त्यानंतर घरी परतली नाही, या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्या प्रकरणी शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (kidnapping of girl student from near Hotel Kasturi jalgaon crime news)

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोळावर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. बेंडाळे महाविद्यालयात मुलगी ११ वीला शिक्षण घेत आहे. शुक्रवार(ता.१७) तिचा पेपर असल्याने पेपर देण्यासाठी मुलगी घरातून बाहेर पडली, तिला कुटुंबीयांनी हॉटेल कस्तुरी येथून रिक्षात बसविले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

त्यानंतर उशिरापर्यंत मुलगी घरी आलीच नाही, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही, अखेर तिला कुणीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची खात्री झाल्यावर मुलीच्या वडिलांनी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.