Latest Marathi News | अशोक महाजन यांचा जामीन अर्ज फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kirankumar Bakale Controversy Case

Kirankumar Bakale Controversy Case : अशोक महाजन यांचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव : मराठा समाजाप्रती अक्षेपार्ह्य वक्तव्य केल्या प्रकरणात हजेरी मास्तर अशोक महाजन याचा जामीन अर्ज आज जिल्‍हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह वादग्रस्त संभाषात सहभागी गुन्हे शाखेचा हजेरी मास्तर अशोक महाजन याच्यातर्फे अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता.

न्या. एस. एन. माने यांच्या न्यायालयात या अर्जावर कामकाज झाले. बचाव पक्षातर्फे शपथपत्र सादर करण्यात आले. सोबतच येत्या शुक्रवारी आवाजाचे नमुने आणि तपासाला सहकार्य करण्याची हमी अशोक महाजन यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडली. (Kirankumar Bakale Controversy Case Ashok Mahajan bail application rejected Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon : पोटावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आज अशोक महाजन यांच्या अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी तर महाजन यांच्यातर्फे ॲड. केदार भुसारी यांनी बाजू मांडली.निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला असून न्यायालयातर्फे त्या निकालाचे अवलोकन करण्यात आले.

जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच अशोक महाजन यांनी त्यांचा मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार नोंदवली. अर्थात ज्या मोबाईलमध्ये बकाले आणि महाजन यांचे वादग्रस्त संभाषण रेकॉर्ड झाले होते, तोच मोबाईल हरवल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे बकालेंच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले होते.

हेही वाचा: Jalgaon : अजिंठा लेणीतील बससेवा सोमवारी बंद; हजारो पर्यटकांचा हिरमोड; प्रशासनाविरोधात रोष