Latest Marathi News | गरीब हमाल तरूणावर चाकूहल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Jalgaon Crime : गरीब हमाल तरूणावर चाकूहल्ला

जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील क्षत्रिय मंगल कार्यालयासमोर हमाली करणाऱ्या तरुणावर एकाने चाकूने हल्ला चढविला. कारण नसताना त्याला जखमी केल्या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शिवाजीनगर हुडको परिसरातील आनंद तुकाराम जमदाळे (वय २४) मालधक्यावर हमाली करून रात्रीच्या वेळी तो शिवाजीनगर भागातील क्षत्रिय मंगल कार्यालयासमोरून जात हेाता. तेव्हा बबल्या हिरालाल जोहरे ऊर्फ बबल्या चॉपर त्या ठिकाणी आला.(Knife attack on poor worker youth Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Crime : अघोरी शक्तीची भिती घालून दाम्पत्याची 11 लाखात लूट

त्याने आनंदच्या उजव्या बाजूला कंबरेवर चाकूने वार करून दुखापत केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत लाथांनी मारहाण केली. जखमी आनंदचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतल्यानंतर बबल्या हिरालाल जोहरे ऊर्फ बबल्या चॉपर (रा. शिवाजीनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार संजय झाल्टे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Health : ही कामे केल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीच करू नका

टॅग्स :Jalgaoncrime