
राखेची विल्हेवाट लावण्यासाठी येथून जवळच विल्हाळे शिवारातील वन विभागाच्या मोकळ्या जागेत शासनाचा निधी खर्च करून तलावांची निर्मिती केलेली आहे.
वरणगाव : येथून जवळच विल्हाळे शिवारात दीपनगर विद्युत केंद्र प्रशासनाने प्रकल्पातील राखमिश्रित पाणी सोडण्यासाठी कोट्यवधींचा शासकीय निधी खर्च करून तलावांची निर्मिती केली आहे. या तलावाची भिंत फुटून राख भरणाऱ्य़ा मजुरांची धावपळ उडाली.
महत्वाची बातमी- महाजनांचे अज्ञान, रेकाॅर्डींग काढले तर - अॅड विजय पाटील -
वीज प्रकल्पात वीज निर्मितीसाठी दररोज शेकडो टन कोळशाची राख तयार होते. त्या राखेची विल्हेवाट लावण्यासाठी येथून जवळच विल्हाळे शिवारातील वन विभागाच्या मोकळ्या जागेत शासनाचा निधी खर्च करून तलावांची निर्मिती केलेली आहे. या तलावामध्ये दहा किलोमीटर पाइपलाइनच्या सहाय्याने राख आणि पाणीमिश्रित स्वरूपात सोडण्यात आलेली आहे. हे तलाव पूर्ण क्षमतेने भरू नये, या दृष्टीने दीपनगर प्रशासनाने कोणालाही केव्हाही विनामूल्य राख वाहून नेण्याची मुभा दिलेली आहे.
अचानक मोठा आवाज झाला
त्याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. १८) रात्री दोनला २५ ते ३० मजूर वाहनांमध्ये राख भरत असताना अचानक काहीतरी आवाज आला आणि क्षणात मजुरांपर्यंत पाण्याचे लोंढे आल्याने त्यांनी तेथून पळ काढला.
आवश्य वाचा- शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आगळीवेगळी वरात; वाहनावरील सजावटीमुळे सर्वत्र कौतुक
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना
भल्या मोठ्या व्यासाच्या तलावात राख वगळता पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी तलावामध्ये ठिकठिकाणी बांध तयार केले आहेत. शासन निर्णयानुसार सदर बांध भविष्यात फुटले जाणार नाही किंवा त्यापासून कोणाला त्रास होणार नाही, त्या दृष्टीने प्रशासनाने मुरूम-माती आणि दगडांच्या पिंचीगप्रमाणे अंतर्गत बांध तयार करणे आवश्यक असताना दीपनगर प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संबंधित ठेकेदारांनी मुरूम-माती आणि दगडांच्या पिचऐवजी सदर बांध राखेचे वरम करून त्यावर तलावाबाहेरील माती टाकून तयार केले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे