Kamika Ekadashi 2023 : संत दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी! दुमदुमले अवघे तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर

Adishakti Muktai
Adishakti Muktai esakal

Kamika Ekadashi 2023 : आषाढी कामिका एकादशीला आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या दर्शनासाठी लाखो वारकरी शेकडो पायी दिंड्यानी श्रीक्षेत्र मुक्ताईनगर व कोथळी स्थित नवीन व जुन्या मंदिरात टाळ-मृदंगाच्या गजरात हजेरी लावल्याने संपूर्ण मुक्ताईनगरी टाळ-मृदुंगाच्या मंगलमय धुनित दुमदुमल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. (Lakhs of devotees took darshan of Adishakti Sant Muktai jalgaon news)

आषाढी एकादशीला पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर वारकरी घराकडे परतल्यानंतर आपापल्या परिसरातील संत दर्शन घेण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार खानदेश, विदर्भ व मध्य प्रदेशातील लाखो भाविकांनी आज तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे येऊन आदिशक्ती संत मुक्ताई दर्शन घेतले.

या वेळी शहरातील रस्त्यावर व मंदिर परिसरात दिंडी सोहळ्याच्या पवित्र टाळ, मृदुंग व नामघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Adishakti Muktai
Kamika Ekadashi 2022: पापमुक्त व्हायचं? एकादशी व्रत करा, येतील शुभ संकेत

यात्रेस्वरुपातील गर्दीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ते २० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊन पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत वाहतुकीची कोंडी देखील सुरळीत करण्यात येत होती.

फराळ, दराबा व खेळण्यांच्या दुकानांनी व भाविकांची सकाळपासूनच लाखाच्या वरील उपस्थितीने तसेच दिंडी सोहल्यांनी जणू यात्राच भरलेली येथे दिसून येत होती.

Adishakti Muktai
Kamika Ekadashi : कामिका एकादशीला या मंत्रांचा जप केल्याने होतो लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com