Gulabrao Patil : मुख्याध्यापकांनो, शाळेची गुणवत्ता वाढवा

मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून राज्यात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
Launch of My School Beautiful School Campaign by gulabrao patil
Launch of My School Beautiful School Campaign by gulabrao patil esakal

जळगाव : मुख्याध्यापक विद्यार्थ्यांसह समाज घडवण्याचे कार्य करत असतात. बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकांनी अद्ययावत राहून डिजिटल झाले पाहिजे.

मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून राज्यात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. (Launch of My School Beautiful School Campaign by gulabrao patil jalgaon news)

सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल येथे जळगाव पंचायत समितीतर्फे ‘मुख्यमंत्री, माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानाच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

सुरवातीला या उपक्रमाचे श्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. डायटचे डॉ. अनिल झोपे यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ.झोपे यांच्या कार्याचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी, प्रत्येक घटकाने व मुख्याध्यापकांनी दिलेली जबाबदारी नियोजनाप्रमाणे पूर्ण करून लोकसहभाग वाढवावा.

शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, या अभियानामुळे शाळेला समाजाचा आधार मिळेल आणि समाजाला शाळेचा आदर्श मिळेल ही भावना निर्माण होण्यास मदत होईल.

Launch of My School Beautiful School Campaign by gulabrao patil
Nandurbar Educational News : आता दर शनिवारी 'दप्तराविना शाळा'

प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी शेख खलील यांनी ‘मुख्यमंत्री, माझी शाळा - सुंदर शाळा’ उपक्रमाचे उद्देश व सविस्तर माहिती दिली.

उपशिक्षिका अनिता चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विस्तार अधिकारी विजय पवार यांनी आभार मानले.

डायटचे प्राचार्य डॉ. झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी शेख खलील, व्याख्याते डॉ. जे. बी. दरंदरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, सरला पाटील.

जितेंद्र चिंचोले, शिक्षक सेनेचे नरेंद्र सपकाळे, सेंट टेरेसा शाळेच्या प्राचार्य सिस्टर ज्युलिट, व्यवस्थापक सिस्टर दिव्या यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख , खासगी व जिल्हा परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक - मुख्याध्यापिका उपस्थित होते.

Launch of My School Beautiful School Campaign by gulabrao patil
National Education Policy शिक्षणदिशा : धोरणाच्या वाटचालीवर बोलू काही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com