esakal | वरखेडे शिवरात बिबट्याचा पाठशिवणीचा खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon

वरखेडे शिवरात बिबट्याचा पाठशिवणीचा खेळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे :- चार वर्षापूर्वी वरखेडे शिवारात गिरणा पट्ट्यात नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला होता. बिबट्याला गोळ्या घालून ठार केल्यानंतरही या भागात बिबट्याचे (Leopard) भय अद्यापही संपले नसून गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा (Leopard) पाठशिवणीचा खेळ सुरूच आहे . केळी (Banana) व उसाचे (sugarcane) क्षेत्र बिबट्यासाठी लाभदायक ठरले आहे. मात्र बिबट्याचे अस्तित्व शेतकरी आणि शेतमजुर यांच्यासाठी घबराट पसरवणारे आहे. अनेक शेतकऱ्यांना पावलोपावली बिबट्याचे दर्शन होत आहे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

वरखेडे परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचे नागरीकांना तसेच शेतकऱ्यांना सातत्याने दर्शन होत आहे. काही हिंस्त्र प्राण्यांचा त्याने फडशाही पाडला तसेच वासरांवर हल्ले करून त्यांचे लचके तोडले काही दिवसापूर्वी तर भऊर शिवारात सावजावर झडप घालून ते सावज चक्क झाडावर नेण्याचा पराक्रम बिबट्याने केला होता दहा दिवसापूर्वी वरखेडे येथील राजेंद्र कच्छवा यांच्या वासराचा फडशा बिबट्याने पाडला होता. त्याच भागात आज सकाळी अशोक पाटील यांच्या शेताच्या शेजारी रस्त्यावर बिबट्याचे पायाचे पदमार्क दिसून आले. ज्या भागात रस्त्यावर बिबट्याचे पदमार्ग दिसून आले त्या भागापासून अवघ्या एक हजार मिटर अंतरावर तांडावस्ती आहे.

हेही वाचा: नक्षलविरोधातील अभियानामुळेच पोलिस बेसावध

त्यामुळे तेथील बेसावधपणे कुणी शेळ्या व जनावरे चारण्यासाठी या नियमीतपणे वापर असलेल्या रस्त्याने जंगलात गेेले तर बिबट्याकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिसरात केळी व उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याला सुरक्षीत अधिवास करता येत आहे. पण त्याच्या या अस्तित्वामुळे मात्र परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांच्यात भितीचे वातावरण कायम आहे वरखेडे शिवारात आढळून आलेले पदमार्क हे बिबट्याचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त अरण्याबाबत काहीच निर्णय होत नाही.

हेही वाचा: चार दिवसापूर्वी दिला नोकरीचा राजीनामा अन् त्याने उचलेले हे पाऊल

बिबट्याचे दर्शन

दोन दिवसापूर्वी तुकाराम जगताप यांच्या शेतातील जाळीत बिबट्या झेप घेणार तोच जगताप यांच्या घरातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला असुन या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

बिबट्याचा असलेल्या भागातील नागरीकांनी शेतात जातांना मोठमोठ्याने मोबाईलमध्ये गाणे वाजावीत तसेच वाद्यांचा करावा. शेतात जातांना घोळक्याने काम करावे असे वनविभागाने आव्हान केले आहे.

loading image
go to top