leprosy patients
leprosy patientssakal

Leprosy: जळगाव जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन मोहीम; ‘शून्य कुष्ठरोग रुग्ण’ उद्दिष्ट

Leprosy : जिल्ह्यात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात २०२७ पर्यंत गावपातळीवर शून्य कुष्ठरुग्ण हे उद्दिष्ट ठेवले असून, ते गाठण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहीम राबवली जात आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील ३० लाख ५० हजार २३३ व शहरी भागातील चार लाख ५९ हजार ५४५ एवढ्या लोकसंख्येचे घरोघरी जाऊन प्रशिक्षित टीममार्फत प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे.

यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, पालिका दवाखाने, ग्रामीण रुग्णालये, सर्व शासकीय दवाखाने यांच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण मोहीम राबवली जात आहे. (Leprosy eradication campaign in Jalgaon district news)

तीन हजारांवर टीम

यासाठी जिल्ह्यात तीन हजार ५९ टीम तयार केल्या आहेत. टीममध्ये आशा स्वयंसेवक व एक पुरुष स्वयंसेवक आहेत. हे प्रत्येक गावात घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत तपासणी करतील. टीममधील सर्व सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्ह्यात ६२३ टीम पर्यवेक्षक निवडले आहेत.

ते सर्वेक्षणाच्या वेळी पर्यवेक्षण व मार्गदर्शन करून संशयितांची यादी करतील. त्यांना संदर्भ सेवेसाठी जवळच्या उपकेंद्रात पाठवतील. या सर्वांची तपासणी वैद्यकीय अधिकारी सात दिवसांत करतील. लक्षणे असल्यास आपल्या घरी येणाऱ्या टीमला दाखवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन यंत्रणेने केले आहे.

leprosy patients
Jalgaon News : भारत कुपोषणमुक्त करण्यावर तज्ज्ञांचे विचारमंथन; दोनदिवसीय प्रशिक्षण वर्ग

सक्रिय शोधमोहीम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राबविली जात आहे. या विशेष मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. जयवंत मोरे, जिल्हा शहर अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाय, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे.

अशी आहेत लक्षणे

अंगावरील फिकट लालसर चट्टा, चकाकणारी तेलकट त्वचा, अंगावर गाठी असणे, हातापायाला बधिरता असणे, अशी लक्षणे असलेले तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे, अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी त्वरित तपासणी करून घ्यावी.

leprosy patients
Wedding Season : लग्नाचा ‘धूमधडाका’ 27 पासून; यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com