दलित मुलीच्या अत्याचारातील दोघांना 20 वर्षे सक्तमजुरी

court
courtesakal
Updated on

जळगाव : फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा करून एका शेतात नेत दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोघांना जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ४५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. (Latest Marathi News)

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ वर्षीय बालिकेला २४ नोव्हेंबर २०१९ मध्ये गणेश कमलाकर सुर्वे (वय २०) आणि प्रकाश सुरेश नागपुरे (वय २२, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी, ‘आमच्या बरोबर फिरायला चल’, असे सांगत रिक्षात बसवून निर्जनस्थळी घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला होता. घरी आल्यावर पीडितेने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. पीडिता दलित समुदायातील आणि अल्पवयीन असल्याने बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम-२०१२ सहित, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद झाला. तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सुनील पाटील यांनी तपास केला होता.

court
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची प्रकृती बिघडली; जे. जे. रुग्णालयात दाखल

२० महिन्यांत निकाल

तपास पूर्ण करून २१ जानेवारी २०२० मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याचे कामकाज जिल्‍हा सत्र न्यायाधीश न्या. बी. एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. तपासाधिकारी डॉ. निलाभ रोहन, डॉ. दीपक जाधव, डॉ. कांचन चव्हाण यांच्यासह या खटल्यात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. प्राप्त दस्तऐवज, वैद्यकीय प्रयोगशाळांचे अहवाला, प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्ष यांच्या अधारे संशयित गणेश कमलाकर सुर्वे आणि प्रकाश सुरेश नागपूरे या दोघांविरुद्ध दोषारोप सिद्ध झाले.

घटनाक्रम जसाच्या तसा...

गुन्हा घडला त्या वेळेस पीडिता सतरा वर्षे वय पूर्ण करत होती. संशयितांनी तिला गोड बोलून फिरायला घेऊन जाण्याचे सांगत घरून नेले होते. मात्र, त्यानंतर तिच्यावर ओढावलेला प्रसंग पीडिताने न घाबरता न्यालयात जसाच्या तसा अचूक पद्धतीने मांडला.

court
'आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय'; वादग्रस्त विधानानंतर भाजप आमदारावर गुन्हा दाखल

...असे कलम, अशी शिक्षा

- बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरक्षण अधिनियम-२०१२ चे कलम-५,६ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास, २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने सक्तमजुरी, पॉस्को कलम- ३,४ अन्वये १० महिने सश्रम कारवास, दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने संक्तमजुरी, पॉस्को कलम-७ व ८ अन्वये तीन वर्षे सश्रम कारवास, दोन हजार दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरी, कलम-३६३ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, कलम-३६६(अ) अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास, पाच हजार दंड, दंड नभरल्यास एक महिना सक्तमजुरी आणि कलम-२०१ अन्वये एक वर्षे सश्रम कारवास, दोन हजार दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरी, ॲट्रॉसिटीच्या कलम-३ (१) (डब्ल्यू), (1) (२) अन्वये ६ महिने सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आठ दिवस सक्तमजुरी अशी एकत्र २० वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com