
जळगाव : आसोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेसमोर उभा राहून तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे मृत तरुणाच्या वडिलांनी अशाच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. लखन संजय सोनवणे (वय २२, रा. सुनसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. (Like his father son committed suicide under train jalgaon News)
नशिराबादजवळील सुनसगाव या छोट्याशा गावात लखन संजय सोनवणे दोन भाऊ व आईसह वास्तव्याला होता. सुनसगाव येथील एका खासगी कंपनीत तो नोकरीला होता. बाहेर जाऊन येतो, असे घरात सांगून गेलेल्या लखनने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खांब क्रमांक ४३३/२१ जवळ पवन एक्सप्रेससमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मात्र, मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
पवन एक्सप्रेसखाली चिरडला
पवन एक्सप्रेसच्या लोकेा पायलटांनी स्टेशन मास्तरांना वायरलेसवरून एक तरुण रेल्वे रुळावर आत्महत्येच्या प्रयत्नात उभा आहे, असे बोलणे संपत नाही, तोवर वेगवान पवन एक्सप्रेसखाली लखन चिरडला गेला. स्टेशन मास्तरांनी तत्काळ घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना कळविली. सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रवींद्र तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
खिश्यातील कागदांवरून ओळख
मृतदेहाचा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात रवाना केल्यावर पोलिसांनी बराच वेळ रेल्वे ट्रॅकवर त्याची ओळख पटविण्यासाठी काही सापडते काय, याचा शोध घेतला. छिन्नविछन्न मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यावर पँटच्या खिश्यातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली. मात्र, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
कुटुंबाचा अक्रोश अन् ग्रामस्थ सुन्न
वडील संजय सोनवणे यांनी अज्ञात कारणावरून दोन वर्षांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. बुधवारी (ता. १७) अचानक लखनचा मृत्यूची माहिती कळाल्यावर ग्रामस्थ व नातेवाइकांनी जळगाव जिल्हा रुग्णालय गाठून मृतदेहाची ओळख पटवली.
मुलाच्या मृत्यूची वार्ताकळाच त्याच्या आईसह भावाने एकच आक्रोश केला. लखनच्या वडिलांनी आत्महत्या का केली, याचे कारण समोर येऊ शकले नाही. तशाच पद्धतीने लखलच्या मृत्यूचे कारणही गुलदस्त्यातच असून, सुनसगाव ग्रामस्थही सुन्न झाले आहेत. मृताच्या मागे आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.