Bhalchandra Nemade | हरामखोर लोकांना निवडून देतो, ही त्याचीच फळे : साहित्यिक भालचंद्र नेमाडे

Bhalchandra Nemade
Bhalchandra Nemadeesakal

जळगाव : सर्वसामान्य माणसाला उद्याची काळजी असते. साठ टक्के लोकांना अन्न मिळत नाही, ते अपुरे राहतात. परंतु दुसरीकडे खोक्याची भाषा चालते. आपल्याला हे परवडणारे आहे का? यात कोणता चांगला माणूस धजेल, आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचीच ही फळ आहेत, असा सणसणीत टोला ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी आजच्या राजकारणावर लगावला आहे. जळगाव येथे एका कार्यक्रमाला उपस्थित असताना पत्रकारांशी ते बोलत होते. (Literary Bhalchandra Nemade Statement about politics at jalgaon news)

या वेळी बोलताना ते म्हणाले, की आज केवळ १५ ते २० टक्के लोकांचे चांगले चालले आहे, बाकी लोकांना उद्याची काळजी आहे. काय खावं, काय नाही, हे कळत नाही, ६० टक्के लोक अपुरे राहतात. त्यांना समतोल अन्न मिळत नाही. आज लोकशाही असूनही उपयोग नाही. आपण कुणाला निवडून देतो हेच कळत नाही. हरामखोर लोकांना आपण निवडून देतो, त्याचीच ही फळ आहेत.

आपल्याला कळत नाही कोण चांगलं आहे, आज खोक्यांची भाषा चालते का? ते आज आपल्याला शक्य नाही, यामुळे कुठला चांगला माणूस राजकारणात येण्यास धजावेल. चांगल्या लोकांनी यात पडूच नये, असे आज झाले आहे. आपण कुणाला मत देतो, हेच कळत नाही, ते कळल्याशिवाय सुधारणा होणे शक्य नाही. आज लोकांच्या हातात आहे. लोक जर असेच मुर्ख राहिले तर सरकार असेच येत राहणार, आपल्या लोकांनाच कळले पाहिजे, कोण चांगले आहे, कोण वाईट आहे. कोणत्या पार्टीचं कायं आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Bhalchandra Nemade
Nashik News : नाशिक खरंच सुंदर शहर; आणखी सुंदर होऊ शकते : मावळते आयुक्त नाईकनवरे यांना आशावाद

आपल्याकडे सर्व प्रकारचे लोक आहेत. सगळ्या जातीचे लोक आहेत, अगदी मुसलमानापासून सर्वांनी आपल्या देशाला वर आणलेले आहे. संत तुकाराम महाराजांचे गुरू सुफी होते, संत एकनाथांचे गुरू मुसलमान होते. आपल्या देशात आपण सर्व एकत्र आहोत, जसा हा तसा तो. मात्र ‘फॅसिझम’ वाढविणे यामुळे आपण मागे पडत आहोत. आणि हेच जर वाढत गेले तर आपण मागे मागे जात राहू, हे आता लोकांच्या हातात आहे. आतापर्यंत इतिहास पाहिला तर या देशासाठी कोणी काय योगदान दिले आहे, याची माहिती पाहिजे.

आचार्य विनोबा भावे ‘जय जगत’ म्हणत होते, त्याचप्रमाणे आपली वाटचाल झाली पाहिजे, आपण जे ‘नॅशनालिझम’ करीत आहोत, त्यामुळे आपले फार नुकसान होत आहे. पूर्वी आपले जे ‘पसायदान’ आहे, त्याकडे वळले पाहिजे, सर्वांचे सुख होवो, सर्वांना सगळं मिळो, हेच तत्व आपलं, तेच आपण पाळून याचा द्वेष कर, त्याचा व्देष कर हे आपण टाळंल पाहिजे. आणि त्यातच सर्वांच भंल आहे.

Bhalchandra Nemade
Nashik News : शाही मशीद विश्‍वस्तांकडे अखेर जागेचा ताबा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com