Jalgaon Crime News : ट्रक लूटमार प्रकरणात अवघ्या 12 तासांतच टोळी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon Crime News : ट्रक लूटमार प्रकरणात अवघ्या 12 तासांतच टोळी अटकेत

जळगाव : ट्रक थांबवून लूटमार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ५ संशयित दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या बारा तासांतच गेंदालाल मिल परिसरातून अटक करून चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Local crime branch team arrested 5 suspected robbers in case of looting by stopping truck jalgaon crime news)

जळगाव एमआयडीसी येथून जुन्या बॅटरीज्‌ भरून इंदुर (मध्यप्रदेश)कडे ट्रक (एमएच १८, बीझेड ९९६१) निघाला होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिरपुर बायपास रोडवर हॉटेल सुनीताच्या पुढे गतिरोधकामुळे ट्रकचा वेग कमी झाला.

त्यावेळी एक दुचाकीस्वार ट्रकच्यापुढे येवुन थांबला. ट्रक चालकाने ब्रेक लावताच मागून एका कारमधुन सहा संशयीत खाली उतरले. त्यांनी ट्रकचालक सुरेश प्रतापसींग चव्हाण, विजय सुभाष चव्हाण, क्लिनर अरुण राजू चव्हाण, शेख वसीम शेख हकमी यांना खाली उतरवुन बेमदम मारहाण करत त्यांच्या खिशातील रोख रक्कम हिसकावुन घेतली.

वस्तुत: मालासह ट्रक पळवून नेण्याचा संशयितांचा बेत होता. मात्र, चालकासोबत दोन हमाल, एक क्लिनर व त्याचा मित्र असल्याने त्यांना प्रतिकाराची जाणीव झाली. त्यातच रस्त्यावर वाहतूक सुरळीत सुरु असल्याने मारझोड करत पैसे लूटून दरोडेखेार पळून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे या प्रकरणी चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

रस्तालूट होताच यंत्रणा सक्रिय

दरम्यान, गुन्हा घडल्याचे कळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी तत्काळ गुन्हेशाखेला घटनास्थळी रवाना केले. निरीक्षक किसन नजन पाटील, के. के. पाटील यांच्यासह सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, कर्मचारी विजयसिंग पाटील, अकरम शेख, महेश महाजन, परेश महाजन, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, दीपक शिंदे, दीपक विसावे, शेषराव थोरे, प्रमोद पाटील, संतोष पारधी,

प्रमोद पवार यांच्या पथकाने रात्रीतून संशयीतांचा शोध सुरु करत सकाळी नऊच्या सुमारास पोलिस पथक जळगाव शहरातील गेंदालाल मील येथे धडकले. तेथून नवाबखान गुलाबखान (वय ३२), शाहरुखखान शाबीरखान (वय ३०), सौरभ भुवनेश्‍वर लांजेवार (वय ३५), जावेदखान नसीरखान (वय ३२) आणि प्रदीप राधेश्याम रायपुरिया (वय ३४) अशा चौघांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :JalgaoncrimeVehicle Theft